कर्जत – बारामती ऍग्रोच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाणार आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर मांडणार आहे. नदीकाठच्या गावांसाठी हा अडचणीचा काळ असून, पूर परिस्थितीत नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन युवा नेते रोहित पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील पूरग्रस्तांची भेट पवार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कर्जत तालुक्यातील खेड, औटेवाडी, भांबोरा, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. पवार यांनी आज या भागाचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आज शाळाही बंद ठेवण्यात आल्या. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी या भागाचा दौरा करून तेथील प्रश्न समजावून घेतले. खेड येथे अण्णासाहेब मोरे, युवा नेते नीलेश निकम, उपसरपंच बाळासाहेब मोरे, सुरेश शिंदे, अक्षय वाघमारे आदींशी चर्चा केली.
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर
- Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे
- ‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले
- Ahilyanagar Crime : युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Ahilyanagar Breaking : साडीने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीची आत्महत्या