मी आणि रोहित पवार बरोबर असलो जिल्ह्यात कोणी विरोध करणार नाही – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कर्जत येथील मुख्य रस्त्याला असणाऱ्या गाळे धारकांसाठी मी आणि आमदार रोहित पवार एकत्र येऊन गाळेधारक आणि रस्ता यामध्ये सुवर्णमध्य असा मार्ग काढू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी गाळेधारकांच्या बैठकीत केले.

कर्जत येथील मुख्य रस्त्यावरून अमरापूर-कर्जत-भिगवण हा राज्य मार्ग जाणार असल्याने कर्जत येथील मुख्य रस्त्यावरील गाळेधारकांचे गाळे विस्थापित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गाळेधारकांशी चर्चा करण्यासाठी खासदार विखे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, दादासाहेब सोनमाळी, स्वप्नील देसाई, सचिन पोटरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमित निमकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार विखे म्हणाले, सर्व तालुक्यात रस्ता हा प्रश्न कमी अधिक प्रमाणात निर्माण होणार असल्याने आपण बायपास रस्त्यांचा आराखडा तयार करून या सर्व प्रश्नावर सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या आराखड्यात कर्जत शहरात एक वळणावर जो रस्ता अरुंद आहे तो अरुंदच आहे.

आणि मागे पुढे मोठा केला आहे. गाळेही राहतील आणि रस्ताही होईल. कर्जत नगरपंचायतने आम्हाला इतक्या मोठ्या रस्त्याची गरज नाही असा ठराव मंजूर करून द्यावा. गाळेधारकांचे नुकसान होणार नाहीत व रस्ताही होईल, असा सर्व समावेशक मार्ग काढावा, असेही खासदार डॉ. विखे म्हणाले.

करणारे हा रस्ता करून गेले आणि खासदार आमदार म्हणून आम्हाला निस्तारायला ठेवले. मी आणि रोहित पवार बरोबर असलो, तर मतदारसंघात काय, जिल्ह्यात कोणी विरोध करणार नाही. तसेच कर्जत नगरपंचायत आमच्याकडेच आहे ना? असा मिश्किल सवाल, खासदार विखे यांनी केला.

पोलिसांनी कोळपे व हलवर यांना अटक केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment