अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- सध्या सर्वत्र चर्चेचा आणि गंभीर असा विषय म्हणजे कोरोना होय. एकीकडे देशात व राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढ असताना एक अजबच घटना घडली आहे.
आज कोरोना मोठयांपासून ते लाहनांपर्यंत सर्वाना माहित झाला असून या गोष्टीला लोकांनी एवढे मनावर घेतले आहे आहे, की चक्क शेतात आता एका झाडाचं नावच लोकांनी “कोरोनाचं झाड’ असं ठेवलं आहे.
दरवर्षी पाऊस पडला की रस्त्याच्या कडेला, जंगलात विविध झाडे, गवत उगवते. त्यात काही फुलांचीही झाडे व वेली असतात. त्यातीलच एक म्हणजे “धोत्रा’! लांबलचक पांढरेशुभ्र फूल या झाडाला असते.
रस्त्याच्या कडेला व जंगलात हे फूल अनेकांचे लक्ष वेधून घेते. फुलानंतर या झाडाला एक भोंड येते. त्याच्या आवरणाला काटे असतात. काट्याचे आवरण असलेले हे भोंड सध्या चर्चेत असलेल्या कोरोना व्हायरसच्या व्हिज्वलप्रमाणे दिसते.
जेव्हापासून कोरोना व्हायरस चर्चेत आला तेव्हापासून टिव्ही, वर्तमानपत्रे व शासकीय यंत्रणेकडून होत असलेल्या जनजागृतीत कोरोना विषाणूचा फोटो वापरला जातो.
तोही गोल आणि त्याला काट्याप्रमाणे आवरण आहे. धोत्र्याचे भोंड आणि कोरोना विषाणूचा फोटो हे दोन्ही एकसारखे दिसत असल्याने ग्रामीण भागात धोत्र्याच्या झाडाला आता कोरोनाचं झाड असं म्हटलं जाऊ लागलं आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved