रोजगारासाठी तरुणांचे पंतप्रधानांना साकडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- आम्ही सत्तेत आलो कि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ यांसह अनेक पोकळ घोषणा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत.

उलट कोरोनाच्या या महामारीमुळे सुरु झालेल्या या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली. बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी.

सुशिक्षित व गरजू तरुणांना तातडीने नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी युवक कॉंग्रेसने केली. या संदर्भात युवक कॉंग्रेसच्या येथील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे, की केंद्रातील भाजप सरकारने सहा वर्षांत तरुणांचा मोठा भ्रमनिरास केला. अनेक सहकारी संस्था मोडीत काढून खासगीकरणाला बळकटी दिली.

जीएसटी, नोटबंदी या आत्मघातकी निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. यातच दुर्दैवाने आलेल्या कोरोना संकटामुळे देशात सुमारे 12 ते 15 कोटी नागरिक बेरोजगार झाले.

ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढत्या बेरोजगारीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्राने जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज केवळ घोषणाच ठरली.

सहकारी व लघु उद्योगांच्या सक्षमतेसाठी आर्थिक पॅकेज द्यावे, या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment