आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले रोखावे

Published on -

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर वारंवार होणारे हल्ले रोखावे व त्यांच्या कुटुंबीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने योग्य कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

राज्यासह जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे.नुकतीच निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे.

मनोज आवटी या सैनिकांची हत्या, रायगड जिल्ह्यातील स्वर्गीय सैनिक अतुल मांढरे यांच्या वडिलांची हत्या, ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष भारतीय सेनेत कार्यरत सैनिकांना तसेच त्यांच्या परिवारांना मारहाण,

पुणे जिल्ह्यात सैनिकांच्या जमिनीवर अतिक्रमण अशा अनेक घटना पुढे येत आहे. ज्या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे.

अशा सैनिकांना स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यास अपयश येत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्रात खूप दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले व

त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी अध्यक्ष रामदास गुंड, उपाध्यक्ष सुरेंद्र खेडकर, गोपीनाथ डोंगरे, ईश्‍वर गपाट, रुबेन कमलोरी, तय्यब बेग, राजू सोनसळे, संजू ढाकणे, संजय ढाकणे,

बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाट, संतोष पालवे, कृष्णा चौगुले, अण्णासाहेब भापकर, अकबर शेख आदिंसह आजी-माजी सैनिक उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News