स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळणाऱ्या नागरिकांचे नगराध्यक्षांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

यातच जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पुकारण्यात आलेला लॉकडाऊन व त्याचे नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने केलेले पालन याचे नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी कौतुक केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेचा येथील काळाराम मंदिर परिसरात नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी डॉ. सचिन पर्हे, डॉ. संकेत मुंदडा, निलेश बाबरिया, शिवाजी सोनवणे, डॉ. उमेश लोंढे, संजय पवार, निखील पवार उपस्थित होते.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी आरोग्य मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबविली जात आहे.

त्यासाठी शहरातील नागरीकांनी त्यास प्रतिसाद द्यावा. आरोग्य विभाग आपल्यासाठी लढत असुन नागरिकांनी त्यांना साथ देत कोविड मुक्तीसाठी सहकार्य करावे.

संसर्ग झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजनाचे पालन करण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved