अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कांदा निर्यातबंदी मुळे शेतात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येणाची वेळ आली आहे. कोरोनामुळे अआर्थिक कंबरडे मोडलेल्या बळीराजाला आता कुठे सुगीचे दिवस येऊ लागले होते.
मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार असून
केंद्रशासनाने कांदा उत्पादकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन त्वरित निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केली आहे.
तनपुरे म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षापासून दुष्काळ व मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यावर्षी उन्हाळ कांद्याला थंडी व इतर हवामान अनुकूल नसल्याने उत्पादनात कमालीची घट आली आहे व उत्पादन खर्च मात्र वाढला आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कांदा भिजला.त्यातच लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व बाजारपेठ व शहरी वाहतूक बंद असल्याने कांद्याला ग्राहक नव्हता.
ओला झालेला कांदा लवकर सडू लागल्याने शेतकर्यांना मिळेल त्या भावात कांदा विकावा लागला आहे. आता जरा कुठे कांद्याचे बाजारभाव बर्यापैकी उचल घेत असताना शेतकर्यांना दोन पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण होत होती.
केंद्र शासनाने कांद्यावर अचानक निर्यातबंदी लादली. शेतकर्यांमध्ये अस्वस्थता असून याबाबत शासनाने त्वरित निर्यातबंदी मागे घेऊन कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तनपुरे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved