अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अन्न पदार्थांमध्ये वाढती भेसळखोरीमुळे मानवी शरीरावर याचा मोठा घातक परिणाम होत असतो. मात्र पैसे कमविण्याच्या उद्देशाने माणुसकी विकलेल्या या भेसळखोरांविरोधात पोलीस प्रशासन आक्रमक झाले आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील मळगंगा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीची नगर येथील अन्न औषध प्रशासनाने कसून तपासणी केली.
यावेळी दुधात भेसळीसाठी वापरली जाणारी 2 लाख 64 हजार चारशे सोळा रुपये किंमतीची 2 हजार 796 किलो व्हे पावडर जप्त करण्यात आली आहे.
त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळ चालू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान, या धाडीमुळे अनेक भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
याबात समजलेली माहिती अशी कि, उंबरे येथील मिल्क कंपनीत व्हे पावडर साठवून ठेवल्या बाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीनुसार एस. पी. शिंदे यांच्या पथकाने कंपनीचे कार्यालय व परिसराची झाडाझडती घेतली. यावेळी कार्यालयात व्हे पावडरच्या 96 व शेतात सोळा गोण्या आढळून आल्या.
याबाबत पथकातील अधिकार्यांनी राजेंद्र नामदेव ढोकणे यांना या पावडरबाबत विचारले असता त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही.
ही पावडर दुधात भेसळीसाठी वापरली जात असल्याच्या संशयावरून पथकाने पावडरचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करून सील केला आहे.
ही पावडर कशासाठी वापरली जात होती? मिल्क कंपनीत तिचा साठा कशाकरिता केला जात होता? याबाबतची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved