निधीविना कोविड उपचार केंद्र सापडली संकटात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिह्यातील कोरोनाची वाढती संख्या हि धक्कादायक आहे. हि संख्या लवकरात लवकर आटोक्यात आण्यासाठी जिल्ह्यात गावपातळीवर कोविड केंद्रे सुरु करण्यात आली आहे. मात्र निधीविना काही कोविड उपचार केंद्रे हि अडचणीत आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील संतलुक हॉस्पिटलमधील कोरोना उपचार केंद्रास शासनाकडून आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही.त्यामुळे पैशाअभावी आता येथे रुग्णांना सुविधा देणे अशक्य झाले असून संतलुक हॉस्पिटलच्या चालकांनी प्रशासनाला तातडीने पैसे न दिल्यास नाईलाजास्तव हे उपचार केंद्र बंद करावे लागेल, असे लेखी कळविलेले आहे.

परंतु आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी सर्वप्रकारची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. हे केंंद्र सुरू राहण्यासाठी तहसीलदारांचेही प्रयत्न सुरू आहेत. कोरोना रुग्णांवर श्रीरामपुरात उपचार व्हावेत म्हणून प्रशासनाच्यावतीने जूनपासून संतलुक हॉस्पिटल येथे करोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

आतापर्यंत या उपचार केंद्रातून सहाशेहून अधिकजण बरे होऊन घरी गेलेले आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या रुग्णांवर जे उपचार सुरू आहेत. त्यात ऑक्सिजन, रोजचे डिझेल, रुग्णांना जेवण या खर्चासह नर्स, परिचारिका, सिक्युरिटी गार्ड या सर्वांचा पगार संतलुक हॉस्पिटलने आतापर्यंत केला.

मात्र कोरोना रुग्णांशिवाय येथे दुसर्‍या कोणत्याही रुग्णांवर उपचार सुरु नसल्याने या ठिकाणी संतलुकला दुसरा कोणताच उत्पन्नाचा स्त्रोत नाही. तसेच यामुळे हॉस्पिटलमधील स्टाफचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठीचे उपचार केंद्र व सेवा सुरु ठेवायची असेल तर आता त्यांना तातडीने सरकारकडून पैसे मिळणे गरजेचे आहे.

त्यासाठी संतलुक रुग्णालयाकडून श्रीरामपूरच्या तहसीलदारांना लेखी पत्र देण्यात आले.सदर रक्कम न मिळाल्यास संतलुक हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार करणे अशक्य होणार आहे नव्हे तर नाईलाजास्तव करोना उपचार केंद्र बंद करावे लागेल, असे म्हटले आहे.

या पत्रानंतर काल प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, संतलुक करोना उपचार केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांची बैठक झाली. यावेळी संतलुक हॉस्पिटलने दिलेल्या पत्रावर चर्चा झाली. संतलुकला लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी शासन स्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोत.

मात्र अशा प्रकारे अचानकपणे प्रशासनाने अधिग्रहण केलेले हे संतलुकमधील कोव्हीड उपचार केंद्र घाईघाई बंद करता येणार नाही, (प्रशांत पाटील – तहसीलदार)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment