सहा महिन्‍यात राज्‍यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्‍मपरिक्षण करावे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- देशाचा जीडीपी खाली आला म्‍हणून आरडाओरड करणा-यांनी मागील सहा महिन्‍यात राज्‍यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्‍मपरिक्षण करावे असा सल्‍ला देतानाच, विकास दराचा विचार करण्‍यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटाच्‍या काळात राष्‍ट्रहिता बरोबरच लोकहित साधले.

देशातील सामान्‍य माणसाला आत्‍मनिर्भरतेने पुन्‍हा उभे करण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास दिला असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील ३५० आशा सेविकांना आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या सहकार्याने कोवीड विमा पॉलीसीचे कवच देण्‍यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ७० व्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधुन सेवा सप्‍ताहाच्‍या निमित्‍ताने या पॉलिसीचे वितरण करण्‍यात आले.

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेतील भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे, गणेश कारखान्‍याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, अॅड.रघुनाथ बोठे, शिवाजीराव गोंदकर, तालुका अध्‍यक्ष नंदकुमार जेजूरकर, सभापती सौ.नंदाताई तांबे, शिर्डी नगरपंचायतीच्‍या नगराध्‍यक्षा अर्चनाताई कोते, डॉ.राजेंद्र पिपाड, सभापती बापूसाहेब आहेर, शहर अध्‍यक्ष अनिल बोठे, शरद नाना थोरात, जि.प सदस्‍या सौ.कविता लहारे,

तहसिलदार कुंदन हिरे, आरोग्‍य आधिकारी डॉ.प्रमोद म्‍हस्‍के, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे आदि याप्रसंगी उपस्थित होते. शिर्डी मतदार संघात नागरीकांसाठी सुरु असलेल्‍या मोफत अपघात विमा योजने अंतर्गत नऊ कुटूंबियांना सुमारे १८ लाख रुपयांच्‍या धनादेशाचे वितरण या निमित्‍ताने करण्‍यात आले. याप्रसंगी बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, कोवीड संकटात स्‍वत:चा जिव धोक्‍यात घालून नागरीकांच्‍या संरक्षणासाठी काम करणा-या आशा सेविकांकडे

राज्‍य सरकारने पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. ज्‍यांच्‍यावर जबाबदारी होती तेच घरात बसल्‍यामुळे सामान्‍य माणसाच्‍या हितासाठी कोणतेही काम राज्‍यात झाले नाही.याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्‍या काळात सामान्‍य माणसाला दिलासा देण्‍यासाठी निर्णय प्रक्रीया राबविली. २० लाख कोटी रुपयांचे आत्‍मनिर्भर भारत योजना जाहीर करुन उद्योजकांपासुन ते पथविक्रेत्‍या पर्यंत आणि शेतक-यांपासुन ते महिलांकरीता योजना देवून हा देश पुन्‍हा आत्‍मविश्‍वासाने पुढे नेण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

देशाचा विकास दर खाली आला म्‍हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या नावाने ओरडणा-यांनी मागील सहा महिन्‍यात राज्‍यातील जनतेला कोणता दिलासा दिला? याचे आत्‍मपरिक्षण करावे असा टोला लगावून आ.विखे पाटील यांनी सांगितले की, देशाचा विकासदर खाली आला की वर गेला याचा विचार करण्‍यापेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशतील सामान्‍य माणसाचा विचार केला. देशातील जनतेसाठीच आहोरात्र काम पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम सुरु आहे. देशातील जनतेची काळजी घेतनाच चीन सारख्‍या बलाढ्य राष्‍ट्रालाही नमविण्‍याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

इतर देशांच्‍या तुलनेत भारताचा रुग्‍ण बरे होण्‍याचा दर आणि मृत्‍युदर खुप कमी आहे. मोदीजींच्‍या निर्णय क्षमतेमुळे हा देश संकटातून वाचला असल्‍याकडे त्‍यांनी लक्ष वेधले. शिर्डी विधानसभा मतदार संघात त्‍यांचा वाढदिवस आशा सेविकांसाठी समर्पित करण्‍याचा निर्णय घेतला. आशा सेविकांना विमा पॉलिसीचे संरक्षण देण्‍याचा राज्‍यातील पहिला उपक्रम या निमित्‍ताने संपन्‍न होत असल्‍याचे समाधान आ.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

जिल्‍हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुरदृष्‍टी कोरोना संकटाच्‍या काळात संपुर्ण देशाला पाहायला मिळाली. राज्‍य सरकार फक्‍त बघ्‍याची भूमिका घेत आहे. आशा सेविकांना राज्‍य सरकारने दिलेले विमा कवच केव्‍हाच संपले. शिर्डी विधानसभा मतदार संघात मात्र आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी घेतलेल्‍या निर्णयाचे स्‍वागत करुन हा उपक्रम प्रत्‍येक आमदारांनी आपल्‍या मतदार संघात राबविण्‍याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक अॅड.रघुनाथ बोठे यांनी केले. आरोग्‍य आधिकारी डॉ.प्रमोद म्‍हस्‍के यांनी तालुक्‍यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आकडेवारीसह विषद केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्‍या वाढदिवसानिमित्‍त राहाता येथील ग्रामीण रुग्‍णालयात रक्‍तदान शिबीर आणि वृक्षारोपण करण्‍यात आले. मुळा प्रवरा सहकारी विज संस्‍था आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरीअल हॉस्‍पीटल यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सभासदांच्‍या कोवीड चाचणी सेंटरचा शुभारंभ बाभळेश्‍वर येथे आ.विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झाला. याप्रसंगी तुकाराम बेंद्रे, बाळासाहेब म्‍हस्‍के, डॉ.दिपक म्‍हस्‍के, शंकरराव बेंद्रे, रामचंद्र जवरे, आण्‍णासाहेब बेंद्रे, साहेबराव म्‍हस्‍के आदि पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment