झेडपीच्या प्रांगणात रंगले गोट्या खेळो आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-   आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांचा नंबर लागूनही त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही तसेच शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदे मधील शिक्षण विभागात गोट्या खेळो आंदोलन केले.

आरटीई अंतर्गत येथील शहरातील एका शाळेत २२ विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे. परंतु, सदर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी केली.

दरम्यान पैश्याची मागणी करणाऱ्या व इतर कारणे दाखवून प्रवेश नाकारणाऱ्या सदर शाळेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते.

दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोफत ॲडमिशन देण्याबाबत तसेच सात दिवसात सदर शाळेवर कारवाईचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र एक महिना उलटून देखील दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता झाली नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पालकांसह शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करुन,

गोट्यांचा खेळ मांडला होता. शिक्षणाधिकारी यांचा सदर शाळेवर धाक नसल्याने पालकांची लूट व मनमानी कारभार सुरु आहे. एक महिना उलटून देखील सदर शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. आरटीईमध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना

आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, निलेश बांगरे, विशाल म्हस्के, देवीदास टेमकर, वैभव म्हस्के आदिंसह पालक सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment