अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने जे नवे कृषि धोरण देशावर लादून शेतकर्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केला आहे. त्याचप्रमाणे नवीन कामगार धोरणातही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करुन त्यांचे हक्का हिरावून घेण्यात आले आहे.
त्यांच्या या धोरणाला प्रखर विरोध करुन अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध केला आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले.
तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आणि शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, पक्षनिरिक्षक अनिल भांबरे, भिंगार अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले,
अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश चिटणीस फिरोज खान, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, महिला प्रदेश सदस्य शिल्पा दुसुंगे, महिला कार्याध्यक्षा शारदा वाघमारे, भिंगार महिलाध्यक्षा मार्गारेट जाधव आदि उपस्थित होते.
गांधीजी आणि शास्त्रीजींच्या विचारावर काँग्रेस आजही वाटचाल करत असल्याचे विविध पदाधिकार्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. तर विद्यमान भाजप प्रणित केंद्र सरकार या नेत्यांच्या विचाराला आणि धोरणाला हरताळ फासून हुकूमशाही राजवाट देशावर लादत असल्याचा आरोप करण्यात आला.
सामान्यांची मन की बात या नेत्यांनी ऐकली आता सामान्यांचा आवाज दाबून त्यांनाच ऐकविले जाते, अशी टिका यावेळी करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी व प्रियंका गांधी यांना पोलिसांकडून जी धक्काबुक्की झाली,
त्याचा निषेध करुन योगी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी , अभिजित कांबळे, शशिकांत पवार, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, रवी सूर्यवंशी, जरिना पठाण, रजनी ताठे, किरण अळकुटे, अनिल परदेशी,
अज्जूभाई शेख, फैजल शेख, शाहूराजे शर्मा, अॅड.ए.जी.खान, अॅड.सलिम रंगरेज, अॅड. नरेंद्र भिंगारदिवे, सलिम रंगरेज, परवेझ झकेरिया, निजाम पठाण, सुभाष रणदिवे, संतोष कांबळे, विवेक येवले, डि.जी.भांबळ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved