बालविवाह लावल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- नेवासा तालुक्यातील कौठा (ता.नेवासा) येथील एका अल्पवयीन मुलीचा श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात बालविवाह लावल्याची खळबळजनक घडण उघडकीस आली आहे.

याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कौठा व औरंगाबाद येथील अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, अल्पवयीनमुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की मी एक वर्षापूर्वी एक मुलगा व दोन मुलीसह बहिणीकडे राहायला आले होते.

सहा महिन्यापूर्वी पती तीनही मुलांना दमदाटी करुन कौठा या गावी घेवून गेले होते. १४ ऑक्टोबरला त्यांनीच मुलीच्या विवाहाबद्दल माहिती दिली.त्यानंतर चाईल्ड लाइनच्या मदतीने फिर्याद दिली, असे मुलीच्या आईने म्हंटले आहे.

आईच्या फिर्यादीनुसार संबंधित अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe