पठारभाग बनतोय चोरट्यांचा हॉटस्पॉट; बंद बंगला फोडत मुद्देमाल केला लंपास

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपांच्या घटनांमध्ये जास्तच वाढ होऊ लागली आहे.

यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे येथील पोलीस प्रशासनाच्या कामाबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे.

संगमनेर तालुक्याचा पठारभाग नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता पुण्याला स्थायिक असणार्‍या धुमाळवाडी येथील देशमुख कुटुंबियांचा बंगला सोमवारी (ता.26) रात्री अज्ञाताने फोडून मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत देशमुख यांनी तिसर्‍यांदा चोरी झाल्याचा तक्रार अर्ज घारगाव पोलिसांना दिला आहे. या तक्रार अर्जात बाळासाहेब माधव देशमुख यांनी म्हंटले आहे की, पुण्याला वास्तव्यास असल्याने धुमाळवाडी येथील बंगला बंद असतो.

याच संधीचा फायदा अठवत चोरट्याने बंगला फोडून मुद्देमाल लांबविला आहे. यापूर्वी देखील चोरी झाल्याबाबतची तक्रार घारगाव पोलिसांनी दाखल करुन घेतली नाही.

त्यावेळस पेन ड्राईव्हमधील सीसीटीव्हीचे फुटेज देखील पोलिसांना दिले होते. मात्र अद्यापही तपास लागलेला नाही. आता तरी पोलिसांनी लक्ष घालून चोरीचा तपास लावावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe