अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील गटनेते अनिल कराळे यांचे दीर्घ आजाराने आज (दि.13) निधन झाले. ते 41 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. ऐन दिवाळीत कराळे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने शिवसेनेत शोककळा पसरली आहे.
त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे आहे. त्यांच्यापश्चात 2 मुले, आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. ते जिल्हा परिषदेच्या मिरी गटातून विजयी झाले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved