जर तुम्हाला रात्रभर नीट झोप लागली नाही तर दुस-या दिवशी अस्वस्थ वाटते. कमी झोपेमुळे तुमचेे डोके जड होते व संपुर्ण दिवस कंटाळवाणा जातो. रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा.दुस-या दिवशी महत्वाची मिटींग असणे, क्रेडीट कार्डचे भरमसाठ बिल येणे, वैवाहिक जीवनातील समस्या, वेळेअभावी दुर्लक्षित झालेली कामे अशी झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात.
शहरी जीवनशैली-

कॉर्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही पहाणे, सकाळी लवकर उठावे लागणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हॉट्सअपवर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते.
गाल ब्लेडर सर्जरी-
गाल ब्लेडर सर्जरी मध्ये पित्ताचे खडे झाल्यास तुमचे गाल ब्लेडर अथवा पित्ताशय काढून टाकण्यात येते. पित्ताशय जड अन्नाच्या पचनासाठी अतिशय उपयुक्त असते.जेव्हा तुम्ही रात्री बराच वेळ उपाशी रहाता तेव्हा पित्ताशय पित्त साठवून ठेवते.पण पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमुळे हा ताण लहान आतड्यावर येतो.त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर ब-याचदा झोपेच्या समस्या निर्माण होतात.
टीथ ग्राईंडींग-
दात कराकरा वाजवण्याच्या समस्येमुळे रात्री तुमची झोपमोड होऊ शकते. ही समस्या ब-याचदा ताण-तणावामुळे होऊ शकते. या समस्येत दातांवर पडणारा दाब इतका असतो की कधीकधी यामुळे दात तुटू देखील शकतात. यामुळे मज्जासंस्थेवर व तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम होऊन झोपेची समस्या निर्माण होते.
विटामिन्स-
आपण निरोगी रहाण्यासाठी अनेक विटामिन्स घेतो पण आश्चर्याची बाब म्हणजे या विटामिन्स मुळे तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. स्लीप मेडीसिन या जर्नल मध्ये छापून आलेल्या एका संशोधनानूसार एक किंवा अधिक विटामिन घेतल्याने तुम्हाला झोपेची समस्या, झोपमोड होणे अथवा निद्रानाश होऊ शकतो. झोप येणे अथवा जाग येणे यावर आपल्या मज्जासंस्थेचे नियंत्रण असते.
कर्करोग-
कर्करोगाच्या रुग्णांंमध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचारांची कमतरता,पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य ,कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होणे, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. अनेक संशोधनात निरनिराळ्या कर्करोगाचे निदान होण्यापुर्वी ६ महिने व निदान झाल्यावर १८ महिने कमी झोप व थकवा ही लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात.
- NAALCO Share Price: 1 महिन्यात नाल्कोने दिले 15.05% रिटर्न…आज कमावण्याची संधी
- TCS Share Price: टीसीएस शेअरची किंमत वधारली! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी…बघा परफॉर्मन्स
- BEL Share Price: संरक्षण क्षेत्रातील ‘या’ शेअरमध्ये कमाईची संधी? टार्गेट प्राईस आणि रेटिंग अपडेट
- JP Power Share Price: 3 महिन्यात 19.43% तेजी! 20 रुपयेपेक्षा कमी किमतीचा स्टॉक आज तेजीत…बघा अपडेट
- RVNL Share Price: RVNL शेअर करिता पुढील टार्गेट प्राइस जाहीर! SELL करावा की HOLD?