अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जगासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. याला रोखण्यासाठी अनेक कोरोनाचा योद्धा या लढाईत आपला सहभाग नोंदवत आहे.
यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. या कोरोना योध्यांच्या कुटुंबियांना शासनाने मदतीची घोषण केली होती. त्या अनुषंगाने काहींना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या दोन ग्रामसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी 50 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यात वाळकी (ता. नगर) येथील ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वैराळ व वारणवाडी-नांदूर पठार (ता. पारनेर) येथील ग्रामसेवक प्रशांत अहिरे यांचा समावेश आहे. शासनाने या कोरोनायोद्धांसाठी प्रत्येकी 50 लाखांचे विमा कवच जाहीर केले होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरूवारी नगर दौर्यावर असताना या कर्मचार्यांच्या कुुटुंबीयांना या रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप ग्रामस्थांना करण्यात येणार आहे.
त्या औषधाचे प्रातिनिधीक वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते नगर तालुक्यातील पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकार्यांना करण्यात आले.तर जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांसंदर्भात अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved