डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता-जाताही चीनला दिला जब्बर धक्का ; केले ‘असे’ काही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांतही चीनबद्दल कठोर भूमिका घेताना ते दिसत आहेत.

ट्रम्प यांनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेर काढण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. हा कायदा चिनी कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजमधून बाहेर काढेल.

नवीन कायदा म्हणतो? :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘होल्डिंग फॉरेन कंपनी अकाउंटटेबल अ‍ॅक्ट’ कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. या कायद्यात असे म्हटले आहे की ज्या कंपन्या सलग तीन वर्षे अमेरिकी पब्लिक अकाउंटिंग ओवरसाइट बोर्डाच्या ऑडिट नियमांचे पालन करीत नाहीत त्यांना कोणत्याही अमेरिकन एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जाणार नाही. तथापि, हा कायदा कोणत्याही देशातील कंपन्यांना लागू आहे. परंतु अमेरिकेतील लिस्टेड अलिबाबा, टेक फर्म टेक फर्म Pinduoduo Inc आणि दिग्गज तेल कंपनी पेट्रोचाइनाला बाहेर काढणे हा त्याचा खरा उद्देश आहे.

अमेरिकेने डझनभर चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले :- यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने चीनमधील डझनभर कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. यामध्ये चिपमेकर एसएमआयसी आणि चीनी ड्रोन निर्माता एसझेड डीजेआय टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड सारख्या नामांकित कंपन्यांचा देखील समावेश आहे.

रिपब्लिकन ट्रम्प यांनी व्यापार आणि अनेक आर्थिक मुद्द्यांवरून वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या लढाईत आपली प्रतिमा चमकवण्याचा नवा प्रयत्न म्हणून हे पाऊल पाहिले जात आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने म्हटले आहे की एसएमआयसीविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे कारण बीजिंग सैन्य काही उद्देश समोर ठेऊन नागरी तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत आहे आणि त्यातून उद्भवणार्‍या चिंतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

अमेरिका-चीन संबंधात दीर्घकाळ तणाव :- गेल्या वर्षभरात वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील संबंध लक्षणीयरीत्या खराब झाले आहेत. कोरोनाव्हायरसच्या साथीचा प्रसार, दक्षिण चीन समुद्रात लष्करी तळ बांधणे आणि हाँगकाँगमधील मानवाधिकारांचे उल्लंघन या गोष्टींवरून अमेरिका-चीन संबंधात दीर्घकाळापासून तणाव निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News