कोल्हार येथील पुलावरील पोहोचमार्ग दुरुस्ती काम- वाहतुकीत बदल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्‍ह्यामधील कोपरगांव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम मे. डायमंड कंस्ट्रशन कंपनी, मु.पो. लोणी यांना देण्यात आलेले आहे. सदर काम चार टप्प्यामध्ये पुर्ण करण्यात येणार आहे.

त्‍यापैकी पहिला टप्‍पा हा दि. 4 जानेवारी 2021 ते 5 जानेवारी 2021, दुसरा टप्‍पा 8 जानेवारी 2021 ते दि 9 जानेवारी 2021, तिसरा टप्‍पा 11 जानेवारी 2021 आणि चौथा टप्‍पा 13 जानेवारी 2021 या टप्‍पे ठरविण्‍यात आलेले आहे.

पुलाच्या बांधकामाच्या वेळी चारही टप्प्यामध्ये वाहतूक वळविण्यात येणार असून याबाबत कोणाच्या हरकत असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षककार्यालयातील जिल्हा विशेष शाखा,

पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर, येथे समक्ष येवुन किंवा email – [email protected] यावर दिनांक २७ डिसेंबर २०२० पर्यंत द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

पुलाचे बांधकामाच्या वेळी वरील चारही टप्‍प्‍यामध्‍ये वाहतुक पुढीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे. अहमदनगर कडुन संगमनेर, येवला, मनमाड, मालेगांव, धुळे कडे जाणारी जड वाहने ही नेवासा फाटा- कायगांव टोके फाटा-गंगापुर मार्गे जातील.

इतर हलको वाहने (चार चाकी व दुचाकी) ही नगर – राहुरी फॅक्टरी, श्रीरामपुर, बाभळेश्वर मार्गे जातील. शिर्डीकडून अहमदनगरकडे जाण्यासाठी सर्व वाहने कोल्हार, बेलापूर, राहुरी फॅक्टरी मार्गे जातील. श्रीरामपूर ते बाभळेश्वर ही एकेरी वाहतुक राहील तसेच कोल्हार ते बेलापूर ही देखील एकेरी वाहतुक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News