धक्कादायक : बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे (वय 35) याने स्वत:च्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

शनिवारी पहाटे राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्यामागचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले त्यापैकी दादासाहेब हा दौंड येथील व्यवहार पाहत होता.

त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता. दादासाहेब गेल्या एक महिन्यापासून तणावाखाली होता. का तणावाखाली होता याचे कारण समजू शकले नाही मात्र याच तणावातून दादासाहेबने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment