प्रवाश्यांना लुटणाऱ्या महिला चोरास पोलिसांनी केले गजाआड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील चोरी लूटमार आधी घटना अद्यापही सुरु आहे. मात्र या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

नुकतेच कर्जत तालुक्यात प्रवाश्यांना लुटणाऱ्या एका महिला चोरास पोलिसांनी गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत आणि राशीन येथील एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची नजर चुकवून प्रवाशांकडील रोख रक्कम, साहित्य तसेच पाकीट चोरणाऱ्या महिलेस कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान बस स्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांना सूचना देऊन हे प्रकार उघडकीस आणण्याबाबत आणि प्रवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिसांच्या या कारवाईत अर्चना अजय भोसले, (वय – २१ वर्ष, रा. वाकी, ता. आष्टी) हिस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता राशीन बसस्थानकावरील एक पर्स चोरीचा गुन्हा तिने कबूल केला. तिच्याकडून चोरी केलेला २४०० रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

या महिला आरोपीला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सलीम शेख आणि भाऊसाहेब काळे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe