मोदी सरकार 10 वर्षांपर्यंत देणार पेन्शन; जाणून घ्या ‘ही’ योजना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-  केंद्र सरकारनं प्रत्येक वर्गावर लक्ष केंद्रित करत अनेक योजना सुरू केल्यात. सीनियर सिटीजनसाठीही केंद्र सरकारकडून आणखी एक योजना सुरू करण्यात आलीय. त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना.

प्रधान मंत्री वंदना योजना एलआयसीकडून निवृत्त झालेल्याना डेथ बेनिफिटसह प्रदान केलेली हमी दिलेली पेन्शन उत्पादन आहे. 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती त्यात गुंतवणूक करू शकते. येथे सध्याचा व्याज दर वर्षाकाठी जवळपास 8 टक्के आहे. दरवर्षी त्याचे व्याज दर बदलतात.

या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकता. लॉक-इन कालावधीसह योजनेचा कालावधी 10 वर्षे आहे. पहिल्यांदा ही योजना काही वर्षांसाठी होती, जी गेल्या काही दिवसांपूर्वी 2023पर्यंत वाढवण्यात आलीय. अशातच या योजनेसंदर्भात आपण काही माहिती मिळवूया.

किती रुपये जमा करू शकता? :- या योजनेत कमीत कमी 1.50 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात. त्यानंतर योजनेत गुंतवलेल्या पैशावर 8 टक्के व्याजाच्या हिशेबानं पेन्शन मिळते. त्यामुळे आपल्याला 10 वर्षांपर्यंत पेन्शनची गॅरंटी मिळणार आहे.

किती मिळते पेन्शन?  :- जर आपण या योजनेत 15 लाख रुपये गुंतवणूक करत असाल तर आपल्याला या योजनेत 10 हजार रुपयांची पेन्शन मिळत राहणार आहे. जर आपण कमी पैसे जमा केलात तर आपल्याला दर महिन्याला कमी पेन्शन मिळणार आहे. आपण ही पेन्शन प्रत्येक महिना, दर तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरासाठी घेऊ शकता.

पेन्शन घेण्याच्या पद्धतीत व्याजाच दरही बदलतो. तसेच या योजनेत भाग घेणाऱ्याकडे हा पर्यायही शिल्लक असतो. व्याजाची रक्कम दरवर्षी आपण घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला 1 हजार रुपयांची पेन्शन गॅरंटीनुसार मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment