जामखेड : ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण या भागातील महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
तसेच मतदारसंघात मोठ मोठे उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध होईल.हे सर्व पूर्णत्वास येण्यासाठी याभागात बारामतीचे अतिक्रमण होवू देऊ नका.
असे आवाहन भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.बुधवारी जामखेड तालुक्यातील नान्नज व कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथे येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी वाघ यांनी विरोधकांवर अत्यंत प्रखर टीका करत रावणाची सोन्याची लंका आहे, आणि त्यांच्या घराच्या विटा सोन्याच्या आहेत. परंतु आपल्या काहीच कामाच्या नाहीत.असे टीका रोहित पवार यांचे नाव न घेता केली.