जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या  दिवशी इतके अर्ज दाखल!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु झाली आहे.

अखेरच्या मुदती पर्यंत एकूण ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.  काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या  दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तब्बल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

काल उमेदवारी दाखल करणारात मंत्री शंकररराव गडाख,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप,आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आमदार मोनिकाताई राजळे या दिग्गजांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज छाननी बुधवार दि. २७ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांच्या कार्यालयात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची चांगलीच वर्दळ जाणवली.

उमेदवारी दाखल करण्यासाठी अखेरचा दिवस असल्याने आलेले दिग्गज नेते आणि त्यांचे समर्थक यांच्या गर्दीने सहकारी बॅंकेचा परिसर फुलून गेला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment