अज्ञात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने एकास चिरडले….! ट्रॅक्टरसह चालक पसार, सर्व घटना ही सीसीटीव्हीत कैद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-एका अज्ञात ट्रॅक्टरला जोडलेल्या डबल ट्रॉलीच्या पाठीमागील चाकाखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई महामार्गावरील नवीन मार्केटयार्डच्या गाळ्यासमोर घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई महामार्गावर असणाऱ्या मार्केटयार्डच्या गाळ्यासमोर एका अज्ञात ट्रॅक्टरच्या डबल ट्रॉलीच्या मागच्या ट्रॉलीखाली आल्याने चिरडून एका इसमाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे उमेश गायकवाड, सचिन खेडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या खिशात असलेल्या डायरीवरून त्या मयताची ओळख पटली.

शाहु हरी कांबळे (रा. दह्याळा भांबेरी, ता.अंबड जिल्हा जालना) याच डायरीवरून पोलिसांनी मयताच्या नातेवाईकाशी संवर्क साधून याबाबत माहिती दिली.

हा सर्व प्रकार हा जवळच असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. दरम्यान घटनास्थळावरून वाहन चालक हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पसार झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News