१९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या मदतीने शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ रात्रीच्या वेळी अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून वैभव बाळू खामकर रा. पिंपळगाव पिसा व नीलेश उर्फ सोनु गायकवाड रा.निंबवी यांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी मुख्य आरोपी वैभव खामकर याला अटक केली आहे. दुसरा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील एका १९ वर्षीय दलित तरुणीला गावातील वैभव बाळू खामकर या तरुणाने मी तुझ्याबरोबर लग्न करतो असे म्हणत २५ जानेवारी रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास पिंपळगाव पिसा

येथून निंबवी येथील नीलेश उर्फ सोनू गायकवाड या मित्राच्या मदतीने गाडीतून घेवुन जात २७ जानेवारी रोजी रात्री ९ ते १० च्या वा दरम्यान शहापुर तालुक्यातील धसई गावाजवळ चारचाकी गाडीमध्येच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात सोमवारी, १ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.