बापरे!तब्बल चार लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कर्जत तालुक्यातील राशीन येथे अवैध  गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करत पोलिसांनी विविध कंपनीचा   एकुण ३ लाख९२हजार ९८० रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अवैध धंद्या विरुद्ध जोरदार आघाडी उघडली असून तालुका सरळ रेषेत आणला आहे मात्र आद्यप गुटखा मात्र सर्वत्र मिळत आहे .

या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत पोलीस अधिकारी आणि जवान माहिती घेत होते. राशीन शहरात विजय कानगुडे (रा.राशीन) हे आपले दुकानात गुटखा विक्री करत असले बाबत स.पो.नि सोमनाथ दिवटे यांना गोपनीय माहीती मिळाली.

त्यांनी स्टाफ सह जाऊन छापा टाकला असता, सदर ठिकाणाहून विविध कंपनीचा  एकुण ३ लाख ९२हजार ९८०रुपयांचा गुटखा मुद्देमाल जप्त करण्यात आला  अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी पंचनामा केला असुन सदर बाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव, कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,

यांचे मार्गदर्शनाखाली  राशीन पोलीस दुरक्षेत्रचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस स्टाफ तुळशीराम सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, सचिन वारे, होमगार्ड बापु गदादे यांनी केली आहे.

यामुळे सर्व सामान्य गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसाईका चे धाबे दणाणले असून, बाजारपेठेतून गुटखा गायब झाला असला तरी गरजूना तो चोरी छुपे अद्यापही उपलब्ध होत आहे हे विशेष.