जिल्ह्यात चार लाखाहून अधिकांना पोलिओचे लसीकरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-राज्यस्तरावरुन अहमदनगर जिल्हयाकरीता 6 लाख 10 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी जिल्ह्यामध्ये एकूण 4 लाख 40 हजार 287 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रविवारी शून्य ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामीण भागात 3 लाख 56 हजार 827 (94.56 टक्के),

शहरी भागात 13 हजार 474 (80. 83) तर महापालिका क्षेत्रात 39 हजार 264 (84.88 टक्के) बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.

जिल्ह्यात ग्रामीण, शहरी व महापालिकाक्षेत्रामध्ये एकूण 4 लाख 9 हजार 565 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. दरम्यान लसीकरणाची मोहीम 93 टक्के पूर्ण झाली आहे.

ग्रामीण भागात मंगळवार, बुधवार, गुरूवार असे तीन दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. शहरी भागात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.

राहिलेल्या बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment