कारच्या धडकेत एक ठार; दोघे जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-वाहतुकीच्या नियमांचा भाग केला कि अपघात होणार आणि यामध्ये अनेकांचा बळी जाणार अशा घटना घडत असतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडलेला दिसून येत आहे.

केडगाव-सोनेवाडी रोडवरील एमएसईबी कार्यालयासमोर भरधाव वेगातील सॅन्ट्रो कारने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात संजय महादेव बोडखे यांचा मृत्यू झाला. बोडखे हे केडगाव येथील रहिवासी आहेत.

तसेच इतर दोघेही जखमी झाले. जखमींमध्ये वैभव शरद जाधव (रा.माळीवाडा) व गणेश संभाजी ठोंबरे (रा.पाईपलाईन रोड) यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एक फेब्रुवारी रोजी सॅन्ट्रो कार (क्र.एमएच 12, सीके 2576) चालक भाऊसाहेब दगडू गारुडकर याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गारुडकर हा अकोळनेर येथील रहिवासी आहे. राहुल शंकर पाटील यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादी व त्यांचे सहकारी लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते.

या दरम्यान सोनेवाडीच्या दिशेने येणाऱ्या सॅन्ट्रो कारने जोराची धडक दिल्याने फिर्यादीचा सहकारी संजय बोडखे जखमी होवून मृत्यूमुखी पडला. तसेच वैभव जाधव व गणेश ठोंबरे हेही जखमी झाले. पुढील तपास पोहेकॉ. बाबासाहेब इखे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment