गावठी कट्टयासह दुचाकी चोरटा जेरबंद या पोलिसांची कारवाई । चार दुचाकी हस्तगत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- सध्या शेवगाव शहर व तालुक्याची कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून खून, लुटमार, चोर्‍यामध्ये वाढ झाली आहे.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी शेवगाव पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. अशाच प्रकारे बंदोबस्तावरील पोलिसांना खानापूर-रावतळे,

कुरुडगाव रोडवरील हॉटेल शिवार येथे एक आरोपी आल्याची माहिती समजताच त्याला सापळा रचुन त्यास अटक केली.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरलेल्या चार दुचाकीसह एक गावठी कट्टा सापडला.

हा सर्व मुद्देमाल त्याकडून हस्तगत केला आहे.नामदेव भागवत वटाने (मुळ रा. सावळेश्वर, राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड. हल्ली रा. कुरूडगाव, ता. शेवगाव) अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रभाकर पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोसई. सोपान गोरे, पोलीस अंमलदार बाबासाहेब शेळके,

अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, वासुदेव डमाळे, संदीप दरवडे, किशोर शिरसाठ यांनी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत खानापुर ते रावतळे,

कुरूडगाव जाणाऱ्या रोडलगत असणारे हॉटेल शिवारात यास सापळा रचुन नामदेव भागवत वटाने यास गावठी कट्टा (पिस्टल) व चोरीची मोटार सायकलसह शिताफीने ताब्यात घेतले.

त्यास विश्वासात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या विविध कंपनीच्या चार मोटारसायकल हस्तगत केल्या.

सदर आरोपीविरूध्द पोलीस अंमलदार वासुदेव डमाळे यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe