अशी वेळ कोणावरही येऊ नये ! रात्रपाळीचे काम कराव लागत असल्याने पत्नी घर सोडून निघून गेली आणि…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी पहाटे कामावर असलेल्या एका पहारेकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे.

चंद्रकांत देवराम चव्हाण असे या मृत पहारेकऱ्याचे नाव आहे. दरम्यान पवार यांच्या मृत्यूला फक्त विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील दहा वर्षांपासून सतत व एकाच जागेवर रात्रपाळीचे काम करावा लागत असल्याने चंद्रकांत पवार (वय ३८, रा.खडांबे खुर्द, ता. राहुरी) हे तणावात होते.

याच दरम्यान सततची रात्रपाळीची ड्युटी लागत असल्याने चंद्रकांत यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे चंद्रकांतचा संसार मोडला होता, अशी माहिती चंद्रकांतच्या नातेवाईकांनी दिली.

१ फेब्रुवारी रोजी चंद्रकांत पवार हा नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेला. त्याच्याबरोबर रामाजी गेणूभाऊ शिंदे हा तरूण कामावर होता. दोघे आळीपाळीने जागून पहारा देत होते.

२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान चंद्रकांत पवार हा मृतावस्थेत आढळून आला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या रामाजी शिंदे याने चंद्रकांत यांच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली.

नातेवाईकांनी चंद्रकांत यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe