ऊस तोडणी मजूरांच्या बैलांची चोरी; या ठिकाणी घडला प्रकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- ऊस तोडणी मजूरांच्या सुमारे 1 लाख 20 हजार किमतीचे पांढर्‍या रंगाचे चार खिलारी बैलांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने ऊस तोडणी मजूरांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान हा खळबळजनक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील भोकर स्टँडजवळ घडलेला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधलेले बैल चोरी जाण्याचा हा या परिसरातील पहिलाच प्रकार असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भोकर शिवारातील श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गालगत भोकर स्टँडजवळ बाळासाहेब तागड यांच्या शेतात व येथून जवळ भोकर-कारेगाव रोडलगत राजेंद्र राहींज यांच्या शेतात अशोक कारखान्याचे ऊस तोडणी मजूरांचा अड्डा आहे.

या ठिकाणी ऊसतोडणी मजूर रविंद्र लहु पवार रा. केकत पांगरी ता. गेवराई जि. बिड व बारकु भगवान गायकवाड रा. पिंपरखेड तांडा, ता.चाळीसगाव जि. जळगाव येथील

या ऊस तोडणी मजूरांसह सर्व मजूर शनिवार दि.23 जानेवारीच्या रात्री झोपलेले असताना रात्री बारेवाजेनंतर ते रविवार दि.24 जानेवारीच्या पहाटे तीन वाजेपुर्वी या दोन्ही अड्ड्यावरील मिळून चार पाढर्‍या रंगाच्या खिलारी बैलांची चोरी झाली.

ऊसतोडणी मजूरांसह येथील मुकादम राजेंद्र वाकडे यांनीही या बैलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या मजूरांनी हरेगाव व उंदिरगाव परीसरातील शेती महामंडळाच्या पडीक शेतासह,

लासुर स्टेशन येथील जनावरांचा बाजार व शेवगाव येथील जनावरांचा बाजार आदि ठिकाणी या बैलांचा शोध घेतला परंतू काहीच उपयोग झाला नाही.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रविंद्र लहु पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. मुसद खान यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. रवींद्र पवार हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24