अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :मुंबईला सासर्याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील जवळके येथील एका तीस वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यात पुन्हा कोरोनाने शीरकाव केल्याने प्रशासनासह नागरिकांचे धाबे दणाणले असून या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना ग्राम सुरक्षा समितीसह प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक पार पडली.
यात सात जुलै पर्यंत जवळके गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सात नातेवाईकांना नगर येथे हलविण्यात आले होते.
या सात नातेवाईकांपैकी ५० वर्षीय एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जवळके गावची कोरोना बाधितांची संख्या दोनवर पोहोचली असून, या महिलेच्या संपर्कातील चार व्यक्तींना शुक्रवारी रात्री जामखेड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
गटविकास अधिकारी कोकणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना ग्रामसुरक्षा समितीसह प्रशासकीय यंत्रणेची बैठक पार पडली. यावेळी सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .
या बैठकीत संपूर्ण गाव निर्जंतुकीरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, जवळके गाव ७ जुलै पर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंद करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews