वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळी ताब्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- पारनेर तालुक्यातील पानोली घाट परिसरामध्ये जंगली वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याबाबतची माहिती समजताच वनविभागाच्या पथकाने आक्रमक कारवाई करत सहा शिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे.

या सहाजणांच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत असून पा

नोली घाट येथे वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्वरित त्याठिकाणी कारवाई केली.

यामध्ये आरोपी भाऊ मधे, सिताराम दुधवडे, सोमनाथ जाधव, ताराबाई जाधव, भिमाबाई मधे, सावित्रीबाई दुधवडे (सर्व रा. वासुंदे, तालुका पारनेर) यांना वनाधिकारी कर्मचार्‍यांनी ससा जातीच्या वन्यप्राण्यांची शिकार करून त्यास जिवे मारून सोबत घेऊन जात असताना ताब्यात घेतले.

यामध्ये आरोपींसह तीन ससे, 13 शिकारी जाळे, 1 बोलेरो गाडी (एम एच 23 जे एम 5423), दोन पांढर्‍या रंगाच्या गोण्या, एक तपकिरी रंगाची पिशवी आदी मुद्देमालासह जप्त करण्यात आले.

याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानुसार आरोपींना अटक करून पारनेर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना वन कस्टडी ठोठावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!