केंद्रीयमंत्री नारायण राणे रायगड पोलिसांसमोर जबाब नोंदवणार

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नारायण राणे हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी पोहचले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबाग इथल्या एलसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यासाठी एलसीबी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राणे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून पावणेबाराच्या सुमारास … Read more

डिवायएसपी मिटकेंच्या कारवाईचा सिलसिला सुरूच, दोन अवैध गावठी दारू अड्डे उध्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकाने दोन अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे गावठी … Read more

जिल्ह्यातील ‘ या’ बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची ‘मनसे’ची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सद्यस्थितीत कोपरगाव बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बसस्थानकास ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहराच्या … Read more

बायको माहेरी गेली असताना नवऱ्याने असं काही करून संपविली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील ४३ वर्षीय विवाहित व्यक्तीने राहात्या घरात साडीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेलापूर येथील सुनिल विनायक गायकवाड (वय ४३) याने आपल्या राहत्या घरात घरातच साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली. मयत सुनिल याची पत्नी माहेरी गेली असताना घरात कुणी नसताना … Read more

ना.रामदास आठवले पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर, बुधवारी श्रीरामपूरात नियोजन बैठक

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक श्रीरामपूर येथे १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सांगितले की, येत्या १ ऑक्टोबर रोजी … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. त्यांनी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांच्या या विधानांवर राजकीय … Read more

कोसळधार पावसामुळे ‘ही’ 11 धरणे झाली ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने राज्यातील अनेक धरण साठ्यात पाण्याची मोठी आवक निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी धरणे, नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही पुणे शहराला … Read more

पोलिसांची बेधडक कारवाई; अवैध गावठी हातभट्टी केली उध्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. हि कारवाई डीवायएसपी संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईत एक लाख दोन हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मिटके यांना … Read more

रिलेशनबाबतच्या बातम्या ऐकून भडकली बबिता; म्हणाली….

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्या सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिता ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या बातम्यांवरून बबिता म्हणजे मुनमुन दत्त आणि टप्पू म्हणजेच राज अनादकत या दोघांनी आपल्या संतप्त … Read more

मराठवाड्यातील चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा तर जायकवाडी निम्मे भरले

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मराठवाड्यातील एकूण धरणांपैकी चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर जायकवाडी धरणात 56 टक्के जलसाठा असून खडका बंधारा शंभर टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे. … Read more

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग; सर्वकाही जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- पुण्यातील बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे २५ हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण 12 फायर इंजिन्सच्या मदतीने आग … Read more

मुख्यमंत्र्यांसह दुग्धविकास मंत्र्यांना पाठवली चार हजार पत्र

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तालुक्यातून चार हजार पत्रे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पाठविण्यात आले आहेत. या पत्रात दुधाला एमआरपीप्रमाणे दर मिळावा, यासह इतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान याबाबतची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुप्तधन खोदणाऱ्या सुनील गायकवाड या मजुराची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  बेलापूर गावामध्ये जुलै महिन्यामध्ये गुप्तधन सापडल्याची घटना घटना घडली होती.खटोड यांच्या घरी सापडलेल्या या गुप्तधनामध्ये मोठे चांदी व सोने असल्याची तक्रार हे गुप्तधन खोदण्याचे काम करणारा मजूर सुनील गायकवाड यांनी मेडियाच्या समोर केली होती. त्याच सुनील गायकवाड यांनी बेलापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्यासमोर आपल्या राहत्या घरी काल संध्याकाळी … Read more

वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे देशभरात आरोग्य विभागावर मोठा ताण पडला आहे. यातच अनेक ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांवर उपचार होत नाही व यामुळे रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहे. यातच पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे सध्या समस्येच्या विळख्यात सापडले आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयात एम.डी. डॉक्टर नाही म्हणून व्हेंटिलेटर सुविधा, सीटी … Read more

मुसळधार पावसामुळे आता जिल्ह्यातील ‘हे’ धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील वाढला आहे. यातच जिल्ह्यासाठी समाधानकारक माहिती समोर येत आहे. नुकतेच नगर जिल्ह्याची जीवनदायनी भंडारदरा हे धरण भरले असून आता जिल्हयातील डिंभे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग… कोविड नियमांचे केले उल्लंघन, तब्बल १०० राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू असून, नियम पाळणे हाच एक रामबाण उपाय आहे. परंतु, अनेक ठिकाणी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येत आहे. कोपरगाव शहरात तर विनामास्क रस्ता अडवून, रस्त्यावर मुरुम टाकून तो पसरविताना व गर्दी करुन एका वृत्तवाहिनीला बातमी देताना आणि हातात कोल्हे गटाच्या निषेधाचे फलक घेऊन … Read more

काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आलेले नगर-सोलापूर रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघड

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  नगर-सोलापूर रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान प्रशासनाच्या निष्क्रिय कामाचा नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. रस्ते वाहतूक विभागाने नगर-सोलापूर महामार्गाच्या रस्त्याचे अस्तरीकरण करण्यावर मोठा भर दिला. परंतु, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 619 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम