file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्या सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिता ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

या बातम्यांवरून बबिता म्हणजे मुनमुन दत्त आणि टप्पू म्हणजेच राज अनादकत या दोघांनी आपल्या संतप्त प्रतिक्रया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. राजने पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘जे कुणी माझ्याबद्दल अशा बातम्या लिहित आहेत त्यांनी जरा विचार करा की, या बनावट बातम्यांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो.

माझ्या संमतीशिवाय माझ्याबद्दल काहीही लिहिलं जातंय. अशा बातम्या लिहिणाºया सर्जनशील लोकांनी आपली सर्जनशीलता अन्य गोष्टींमध्ये दाखवावी. देव, अशा लोकांना सद्बुद्धी देवो.’ ‘मुनमुन दत्ताने पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, मला तुमच्याकडून यापेक्षा खूप चांगल्या अपेक्षा होत्या.

पण कमेंट्समध्ये जी घाण तुम्ही ओतली, त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे, तथाकथित सुशिक्षीत असूनही आपण एका मागासलेल्या समाजाचा भाग आहोत. केवळ स्वत:च्या मजेसाठी एखाद्या महिलेच्या वयावर, तिच्या संबंधांवर नको ते बोलून तिला लाजीरवाणं केलं जातं.

मग या विनोदामुळे भलेही एखादी व्यक्ती मेंटल ब्रेकडाऊनच्या अवस्थेत गेली तरी तुम्हाला फरक पडत नाही. मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करतेय. पण माज्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगायला तुम्हाला 13 मिनिटंही लागली नाहीत.

तुमचे शब्द एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडतील, त्याआधी फक्त एकदा विचार करा. तुमचे शब्द एखाद्याला टोकाचं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त तर करत नाहीत ना, याचा विचार करा. आज मला स्वत:ला भारताची लेक म्हणताना लाज वाटतेय,’ असं ती म्हणाली होती.