file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. हि कारवाई डीवायएसपी संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

या कारवाईत एक लाख दोन हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी माहिती मिळाली.

त्यांनी तातडीने पोलीस पथकांना कारवाईचे आदेश दिले. या दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला आरोपी.

Advertisement

याप्रकरणी पोलिसांनी रमेश धोंडीराम गायकवाड (वय 35 रा. खैरी निमगाव) व अर्जुन केशव गायकवाड या दोघांकडून 1,02,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे खैरी निमगाव परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

Advertisement