file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. त्यांनी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत.

हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांच्या या विधानांवर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. काय म्हणाले सोमय्या?

जाणून घ्या हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे. हसन मुश्रीफ कुटूंबीयांने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले आहेत.

सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं कर्ज घेतले असल्याचे दाखवले असून सीआरएम सिस्टीम मधून कर्ज घेणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे. नाविद मुश्रीफच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा, बोगस कंपन्या, त्यांच्या नावे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – मुश्रीफ मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, किरीट सोमय्या यांनी संपूर्ण माहिती घेऊन भाष्य करावं.

त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. सोमय्यांच्या आरोपाने भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. किरीट सोमय्यांनी हवी तिथं खुशाल चौकशी करावी. राज्य सरकारला अस्थिर करण्यासाठीच भाजपाकडून वारंवार आरोप लावले जात आहेत.

चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सोमय्या आरोप करतात. त्यांनी कोल्हापूरात येऊन माहिती घ्यावी असा टोला मुश्रीफांनी लगावला. किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही,

कुठलेही पुरावे नसताना आरोप केल्यामुळे येत्या २ आठवड्यात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.