मित्राच्या बहिणीच्या लग्न पत्रिका वाटणाऱ्या जवानाचा अपघातात मृत्यू

पाथर्डी – मित्रासोबत त्याच्या बहिणीच्या लग्न पत्रिका वाटणाऱ्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे लग्नपत्रिका वाटून परत गावाकडे येत असतांना माणिकदौंडीहून पाथर्डीकडे भरघाव वेगात जाणाऱ्या बोलेरो गाडीने धडक दिली. तालुक्यातील केळवंडी फाट्यावर झालेल्या या अपघातात  सुट्टीवर आलेला जवान दादासाहेब लक्ष्मण आठरे (रा.केळवंडी,ता.पाथर्डी)याचा अपघातात मृत्यू झाला तर त्याचा मित्र ऋषिकेश विक्रम शेटे हा … Read more

पाण्याच्या टाकीमध्ये पडुन ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पारनेर :- तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हुर येथील तन्मय धोंडीभाऊ सुंबे वय 9 वर्षे, या बालकाचा पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दुर्दैवी मृत्यू झाला. या बाबत सविस्तर माहिती अशी की तन्मय सुंबे हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता. गोरेगाव येथील मंथन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता तिसरीचे शिक्षण घेऊन तो चौथी इयत्ता मध्ये गेला होता. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे … Read more

काॅलेजमधील मुलाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

राहुरी :-मुलाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना राहुरीत घडली आहे वैष्णवी कातोरे असे या मृत तरुणीचे नाव असून जोगेश्वरी आखाडा येथील औद्योगिक वसाहतीजवळ कुटुंबाचे वास्तव्य आहे. त्यांची मुलगी वैष्णवी रवींद्र कातोरे ही राहुरीच्या महाविद्यालयात इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. शनिवारी सकाळी … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह लावणाऱ्या आई – वडिलावर गुन्हा

पारनेर  –  तालुक्यातील अपघूप भागातील खंडेश्वर मंदिरात १२ मे रोजी १२ च्या सुमारास एका १८ वर्ष पूर्ण न झालेल्या अल्पवयीन मुलीचा तिने वय १८ वर्ष पूर्ण झालेले नाही हे माहीत असतानासुद्धा तिचे आई – वडील व मुलांकडच्यांनी विवाह लावला. याप्रकरणी काल मुलीचे वृद्ध नातेवाईक विश्न शिवराम गवळी , वय ६८, रा. अपधूप , ता. पारनेर यांच्या … Read more

शॉक बसून विवाहितेचा मृत्यू

अकोले :- पाणी भरण्यासाठी विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा झटका बसून तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी कमानवेस परिसरात घडली. सायरा अकबर शेख (वय ३५) ही विवाहिता आपल्या घरी पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात प्लगमध्ये पीन लावत असताना विजेचा शॉक बसून मरण पावली. या महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग … Read more

आता यापुढचे पाच वर्षेही मोदी वाटच लावणार…

जामखेड :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. यापुढे ते हेच करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांनी चोंडीला भेट देऊन स्मृतिस्तंभास अभिवादन केले. पालकमंत्री राम शिंदे यांनी घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला. … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या चौघांना अटक

सोनई : नेवासा तालूक्यातील चांदा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याच्या कारणावरून अहमदनगरजवळील नागापूर येथील चौघा आरोपींना सोनई पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली आहे. याबाबत पोलीस सूृत्रांकडून समजलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत सोनई पोलीस ठाण्यात २६ मे २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल होता. याबाबतची माहिती मिळाल्यानुसार सोनई … Read more

पालकमंत्र्यांनी केलेली विकासकामे विरोधकांना पहावेना…

अहमदनगर : भाजपाची देशात, राज्यात आणि जिल्ह्यात सुरू असलेली घौडदौड पाहता विरोधकांच्या पोटामध्ये आता गोळा उठण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी अनेक जण आपली पोळी भाजून घ्यायला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तथाकथित कर्जतचे पुढारी म्हणून उदयास येऊ लागले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या वडिलांच्या नावावर असलेला बंगला हा अधिकृत बांधला असून त्याबाबतचा … Read more

दहा लाख रुपये न दिल्याने उच्चशिक्षित पतीकडून माहेरी आलेल्या पत्नीस मारहाण !

श्रीगोंदा : हुंड्यासारख्या वाईट प्रथेमुळे अनेक विवाहित महिलांना आपले प्राण गमवावे लागले, त्यामुळे हुंडाबळी सारखे कायदे आमलात आले. परंतु अजूनही हुंड्यासाठी अनेक विवाहितांचा सासरच्यांकडून शारीरिक, मानसिक छळ केल्याच्या घटना घडत आहेत. अगदी उच्चशिक्षित लोक देखील याला अपवाद नाहीत. नवरा अभियंता, दीर अभियंता सासु सासरे दोघेही शिक्षक असे सर्व कुटुंब उच्चशिक्षित असूनही सुनेच्या घरचे दहा लाख … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावात आणि पदवीतही खोटेपणा !

अहमदनगर :- जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अ‍ॅड. कैलास शंकरराव शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच ‘प्रा. राम शिंदे यांचे खरे नाव रामदास शिंदे असून, त्यांनी ‘रामदास’ऐवजी ‘राम’ नाव लावणे सुरू केले आहे. सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण न होता वा पीएचडी न मिळवता ते स्वतःपुढे ‘प्रा.’ अशी … Read more

पुणे – नाशिक महामार्गावर अपघातात दोघे ठार

संगमनेर – तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला कर्जुले पठार शिवारात झालेल्या अपघातात नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील दोन कर्मचारी जागीच मृत्यू झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले.  याबाबत सविस्तर घटना क्रम असा कि, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहा कर्मचारी जुना आग्रा रोड त्रंबक नाका येथून शासकीय टेम्पो … Read more

अडीचशे वर्षापुर्वी अहिल्यादेवींनी प्रतिकुल परिस्थितीत केलेला राज्यकारभार आजच्या राजकारण्यांसाठी आदर्शवत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्या एक महिला असूनही त्यांनी चांगला राज्यकारभार केला.त्या एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला. अहिल्यादेवींनी न्यायदान प्रक्रिया गतिमान केली. ठिकठिकाणी तलाव बांधले. दुष्काळाचा प्रश्न, महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न सोडवणा-या तेजस्विनी अहिल्यादेवींची ३१मे ला २९४ वी जयंती. अहिल्या-खंडेरावांचा विवाह २० मे १७३३ रोजी झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच त्या … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव – चोंडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव  अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी ( ता.जामखेड) हे गाव पर्यटनदृष्टया महाराष्ट्राच्या नकाशावर येऊ लागले आहे. आज चोंडीचा विकास पुढील ५० – १०० वर्षाचा विचार करून पुर्णत्वाकडे जात आहे. पुण्यश्लोक अहाल्यादेवी होळकर या आदर्श राज्यकर्त्या होत्या .त्या एक महिला असूनही त्यांनी चांगला राज्यकारभार केला. त्या एक उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख व्हावी … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुते शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवण्याचे काम करीत आहेत !

श्रीगोंदा : अधिकारी पाण्याचे नियोजन करत असताना त्यांना सहकार्य करणे योग्य की त्यात खोडा घालणे योग्य हे समजून घेतले पाहिजेत. पाणी प्रश्नी श्रेय मला मिळू नये म्हणून प्रत्येक वेळी आवर्तनात खोडा घालणारे पाचपुतेच खरे झारीतील शुक्राचार्य आहेत. अशी टीका आमदार जगताप यांनी केली. तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी अवर्तनाचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन फळबागांना … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांनी अतिक्रमण करुन बांधला बंगला !

अहमदनगर :- राज्याचे जलसंधारणमंत्री तथा नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जामखेड मध्ये अतिक्रमण करुन बंगला बांधल्याचे समोर आले आहे. मंत्री राम शिंदे यांचे वडिल शंकर बापू शिंदे यांनी मौजे चौंडी, रा. जामखेड, जि. अहमदनगर येथील सर्वे नं. 2/3 या जागेवर चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता या दोन्ही रस्त्यांवर शासकीय जमीनीत … Read more

दिलीप गांधीना संपविण्यासाठी विरोधक सरसावले !

अहमदनगर :- माजी खा. दिलीप गांधी यांची खासदारकी गेली, आता त्यांच्याकडे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष पद आहे. तेही काढून घेण्याचे घाटत आहे. त्यानंतर अर्बन बँकेत पानीपत करण्याची तयारी गांधी विरोधकांनी चालवली आहे. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. नगरमधील वैभवशाली आणि 109 वर्षाचा वारसा असलेल्या या बँकेचे नेतृत्व माजी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे असून त्यांच्या … Read more

विखे-थोरात यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र

‘अहमदनगर :- तुमच्‍यात बदल व्‍हावा म्‍हणून आम्‍ही सातत्‍याने संगमनेरला येतच राहणार. आता देश बदलत आहे, तुम्‍हीही बदला,’ असा सूचक सल्‍ला ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील व्‍यापाऱ्यांना दिला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्‍यापासून ते विजयापर्यंतच्‍या सर्वच घडलेल्‍या घडामोंडीचा मार्मिक आढावा विखे पाटील यांनी दिलखुलास गप्‍पांमधून व्‍यापाऱ्यांपुढे उलगडून दाखविला. यातील ‘संगमनेर’ची भूमिकाही त्यांनी सांगितली. … Read more

मुलीला पळवून नेण्याच्या वादातून मारहाण

अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन … Read more