बोगस मतदारांचं काय होणार? तहसीलदारांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष!

कर्जत: कोळवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ८२ बोगस मतदारांची नोंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या यादीवर ग्रामस्थांनी लेखी हरकती नोंदवल्या आणि त्यावर मंगळवारी (दि. २५) तहसीलदार गुरु बिराजदार यांच्यासमोर सुनावणी झाली. आता तहसीलदार काय निर्णय देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. कोळवडीत बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा चांगलाच गाजला. आगामी ग्रामपंचायत … Read more

गतीरोधकासाठी मुहूर्तच नाही, आमदार ओगलेंच्या पत्राला बांधकाम विभागाची टाळाटाळ!

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर टाकळीभानजवळच्या खिर्डी रोडलगत अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. या ठिकाणी गतीरोधक बसवावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होतेय. जानेवारीत तर इथे झालेल्या अपघातात तिघांचा जीव गेला. या गंभीर परिस्थितीकडे आमदार हेमंत ओगले यांनी लक्ष वेधलं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवलं. पण तरीही बांधकाम विभागाला गतीरोधक … Read more

एसटीत नवीन नियम: चालक-वाहकांना गणवेश सक्ती, नाहीतर होणार दंडाची कारवाई!

अहिल्यानगरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या चालक आणि वाहकांसाठी गणवेश, नेमप्लेट आणि बिल्ला घालणं अनिवार्य केलंय. जर कोणी कर्मचारी तपासणीच्या वेळी गणवेशाशिवाय दिसला, तर त्याला दंड भरावा लागणार आहे. हा नियम लागू करून कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. एसटीच्या चालक आणि वाहकांना कामावर असताना मोटार वाहन कायद्यानुसार … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये थंडपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओही काढले

अहिल्यानगरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसतायेत. नुकत्याच काही घटना ताजा असून आता पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे.थंडपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२१ मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. करण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील तलाठी जाळ्यात ! पतीच्या निधनानंतर वारस लावण्यासाठी महिलेकडे केली ‘ही’ मागणी

अहिल्यानगरमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या वाढत चालली कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांत लाचलुचपतने अहिल्यानगरमध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. या कारवाई होऊनही अद्याप लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. आता अहिल्यानगरमधील एक तलाठी रंगेहात लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलाय. पतीच्या निधनानंतर शेत जमिनीला पत्नीची वारस नोंद लावण्यासाठी ३ हजारांची लाच … Read more

Ahilyanagar News : ‘ते’ दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद, मोठा मुद्देमालही हस्तगत

जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. मुन्ना उर्फ सतीष लायसन भोसले (वय २१) व किशोर उर्फ बुट्या हापुस भोसले (वय २०) (दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक … Read more

Ahilyanagar News : पोलीस दिवसभर कलेक्शन करत फिरतात? पोलिस ठाण्यांत तडजोड गँग? धक्कादायक माहिती समोर

पोलिस स्टेशनमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी आहेत, हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याचा दावा नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. कापड बाजारातील दुकान खाली करण्याकरता लोक येतात व त्याची तोडजोड करण्याचे काम पोलिस स्टेशनमध्ये होते. तोडजोड करणारी गँग पोलिसांची तयार झाली आहे, असेही त्यांचे म्हणणे असून, जिल्ह्यामध्ये … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘या’ महामार्गावर प्रवाशांच्या लुटीचा थरार ! कोयत्याने मारहाण, महिलांनाही नाही सोडले, सगळं लुटले…

अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर प्रवाशांना लुटण्याच्या अनेक घटना अलीकडील काळात घडल्या आहेत.नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीची घटना ताजी असतानाच आता आणखी एक लुटीचा थरार समोर आला आहे. कार मधील कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेण्याची घटना घडली आहे. हा थरार नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारात बंद पडलेल्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये दोन भीषण अपघात ! दोन ठार तिघे जखमी

नगर-सोलापूर महामार्गावर वाळुंज (ता. नगर) गावच्या शिवारात मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २५ मार्चला सकाळी घडली. परवेज बशीर शेख (वय ३३, रा. वाहिरा, ता. आष्टी, जि.बीड) असे मयताचे नाव आहे. मयत परवेज शेख हा आपल्या दुचाकीवर नगरहून सोलापूरच्या दिशेने चाललेला होता. वाळुंज गावच्या शिवारात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने त्याच्या दुचाकीला जोराची धडक … Read more

देहरे येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारा देहरे ग्रामस्थांचे खा. नीलेश लंके यांना साकडे

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने जिल्हयात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी संसदेत मागणी केल्यानंतर या महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. नगर शहरापासून जवळ असलेल्या देहरे येथे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची  मागणी तेथील ग्रामस्थांनी खा. नीलेश लंके यांच्याकडे केली आहे. नगर तालुक्यातील … Read more

सौ. कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी बँकेकडून 10 शाळांना कॉम्प्युटर संच भेट

संगमनेर -लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सभासद शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक कामधेनु असलेल्या अमृतवाहिनी बँकेने सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे .सौ कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने तालुक्यातील 10 शाळांना संगणक संच देण्यात आले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त … Read more

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात ! दोन कारची धडक; एकाचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Pune Highway Accident : सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी दुपारी अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द शिवारात मठ वस्तीजवळ दोन कारचा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. या अपघातात मारुती एर्टिगा (क्रमांक MH … Read more

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगासाठी कोणते कर्मचारी पात्र ठरणार ?

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशात आठवा वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. आता लवकरच आठवा वेतन … Read more

मोठी बातमी ! यंदा शिक्षकांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द, विद्यार्थ्यांनाही यातून ‘सुट्टी’ नाही

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. तसेच दर आठवड्यातील विद्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करून ३० जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशात्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच यंदा त्यांना उन्हाळ्याची सुट्टी उपभोगता येणार नाही. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा … Read more

Ahilyanagar News : नगर स्टॅण्डसमोर थरार ! भरदुपारी कारमध्ये कारचालकाने महिलेचा गळा दाबला, नंतर..

बस स्थानकावरील सुरक्षा हा विषय मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला विषय आहे. महिलांसाठी बसस्थानके किती सुरक्षित यावर अनेक वादविवादही झाले दरम्यान आता नगर स्टॅण्डसमोर एका कारमध्ये महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. शिक्रापूरहून नगरला येण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारमध्ये बसून आलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण कारचालकाने हिसकावून घेतले, … Read more

Ahilyanagar News : माध्यमिक शिक्षक सोसायटीतचा निकाल लागला ! परिवर्तनचा दणदणीत विजय, पहा सविस्तर निकाल…

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा सत्तातंर झाले. विरोधी परिवर्तन मंडळाने २१ च्या २१ जागा जिंकत सत्ताधारी पुरोगामी मंडळाचा सुपडा साफ केला. विरोधकांनी या निवडणुकीत दाखवलेली एकजुट कामाला आल्याचे दिसून आले. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या २१ संचालकमंडळाच्या निवडीसाठी रविवारी मतदान झाले. आज जिल्हा उपनिबधक ( सहकार ) यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

अहिल्यानगरमध्ये भरधाव स्कुलबसचा अपघात ; एक ठार

शिर्डी बायपास रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. दरम्यान आता एका स्कुल बसच्या अपघाताचे वृत्त हाती आले आहे. यात एक महिला ठार झाली असल्याची माहिती समजली आहे. राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावाजवळील वाळकी फाट्यावर शुक्रवारी सकाळी लुना गाडी व कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलाच्या भरधाव वेगाने … Read more

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक बाइक कमी किमतीमध्ये कमी वेळेतील चार्जिंगसह विविध सुविधा

संगमनेर (प्रतिनिधी) – सध्या संगणकीय बरोबर एआयचे युग आले असून नवीन तंत्रज्ञानाबरोबर राहताना अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजारातील इतर इलेक्ट्रिक बाइक पेक्षा कमी किंमतीमध्ये व कमी वेळेत चार्जिंग होऊन जास्त मायलेज देणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनवली असून यामध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी, लायसन ओळख प्रणाली यासह विविध सुविधा देण्यात आले आहेत अमृतवहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षातील “टीम ट्रायडेंट”ने … Read more