संगमनेर मधील रखडलेल्या प्रकल्पाबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली परिवहन मंत्र्यांची भेट

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, स्वतंत्र आरटीओ कार्यालय आणि एसटी बसेसच्या थांब्यांबाबत चर्चा झाली. संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी 21 … Read more

पाणथळ व क्षारयुक्त जमिनीच्या समस्या सोडविण्यासाठी बंदिस्त चर योजना राबविणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

बई, दि. २१ :- पाण्याचा अतिवापर, पाणी निचरा न होणे यामुळे राज्यातील काही भागात पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत बंदिस्त चर योजना राबविण्यात येणार असल्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. सदस्य राहुल कुल यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली … Read more

जुने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास नाबार्डच्या साह्याने कृती कार्यक्रम – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सिंचनासाठी शेतकऱ्यांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी नवीन योजन राबवित असताना जुने प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निरा देवधर प्रकल्प संदर्भात … Read more

एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून ‘त्या’ पोलिसावर हनीट्रॅप ? ५० लाख मागितले? अहिल्यानगरमध्ये खळबळ

अहिल्यानगरमध्ये हनीट्रॅपची प्रकरणे काही नवीन नाहीत. परंतु आता एका प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यालाच हनीट्रॅपमध्ये अडकवले असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. आम्ही एका नेत्याला अडकवलंय आता तुझा कार्यक्रम करू असे म्हणत त्या पोलिसाला महिला पदाधिकाऱ्याने व तिच्याबरोबर असलेल्या दोघांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची … Read more

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ रविवारी संगमनेर मध्ये ! स्थानिक खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार

क्रिकेट हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ असून महिला क्रिकेटची लोकप्रियता ही वाढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी संगमनेर मध्ये येणार असून त्या स्थानिक महिला खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार आहेत याचबरोबर स्थानिक महिलांना प्रशिक्षणही देणार असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात … Read more

महिला केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद – लोकनेते बाळासाहेब थोरात

क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्याचाच परिणाम महिला आता प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण क्रीडा, उद्योग-व्यवसाय, उद्योजकता अशा सर्वत्रच महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आपण महिलांचा आदर केला पाहिजे महिला केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब … Read more

12 वर्षीय मुलीवर पाशवी अत्याचार – आरोपीला न्यायालयाचा दणका, 20 वर्षे तुरुंगवास!

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील रहिवासी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (वय २०) याला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी प्रभावीपणे बाजू … Read more

शाळेची बस चालेल, पण रिक्षा आणि व्हॅन ‘बंद’! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेला प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभागाने नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार, आता फक्त स्कूल बसलाच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परवानगी मिळणार आहे, तर रिक्षा आणि स्कूल व्हॅनला नव्याने परवाना दिला जाणार नाही. या निर्णयामुळे शहरातील ८०३ स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा … Read more

कांद्याने रडवलं! – दर घसरले, खर्चही निघणार नाही; शेतकरी संकटात!

नगर तालुका हा कांदा उत्पादनात राज्यात अग्रेसर मानला जातो आणि येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबून आहे. कांद्याला “पठार” अशी नवी ओळख मिळालेल्या या तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. यंदा विक्रमी कांदा उत्पादन झाले असले तरी बाजारात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याला ५ ते … Read more

१ एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू ! – वारस नोंदीसाठी महसूल विभागाची तयारी!

जामखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १ एप्रिल २०२५ पासून जिवंत सात-बारा मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने या मोहिमेसाठी परिपत्रक जारी करून महिनाभराचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. या मोहिमेचे समन्वय तालुका स्तरावर तहसीलदारांकडे सोपवण्यात आले असून, सात-बारा उताऱ्यांवरील मृत खातेदारांची नावे काढून त्यांच्या वारसांची … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये पुन्हा एक मोठा अधिकारी लाच घेताना जाळ्यात ! मोठी कारवाई

अहिल्यानगरमध्ये यापूर्वीही अनेक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाईही झाली. परंतु लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी होत नाही. आता पुन्हा एक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडला आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्पासाठीचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी तक्रारदारास ४० हजारांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना मत्स्य … Read more

Ahilyanagar Breaking : आशिष येरेकरांच्या विरोधात खा. लंके यांची तक्रार ! सीसीटीव्ही फुटेज तपासले धक्कादायक माहिती समोर…

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत असून त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्याने तपास करून आवष्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रात खा. लंके यांनी म्हटले आहे की, येरेकर यांची … Read more

धर्माच्या आडून जमिनी लाटाल, तर आम्ही थांबणार नाही! रामगिरी महाराजांचा थेट इशारा

राहुरी तालुक्यातील गुहा येथे नुकत्याच पार पडलेल्या श्रीकान्होबा महाराज मंदिर यात्रा उत्सवात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सरकार आणि वक्फ बोर्डावर जोरदार टीका केली. या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी धर्माच्या नावाखाली जमिनी हडपण्याचे प्रयत्न सहन न करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. श्रीक्षेत्र गुहा येथे १८ ते २० मार्च या कालावधीत झालेल्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवात … Read more

१४ एप्रिलपूर्वी कर्जमाफी नसेल तर दूध, साखर, भाजीपाला बंद ! शेतकऱ्यांचा एल्गार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिलच्या जयंतीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, तर साखर कारखान्यांकडून बाहेर पाठवली जाणारी साखर तसेच शहरांना मिळणारे दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात प्रत्येक तालुक्यात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष … Read more

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि २१ : शासकीय जमिन व देवस्थान इनाम जमिनीवर झालेली अतिक्रमणे महसूल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हटवली जातील , असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी सांगितले. सदस्य मोनिका राजळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय जमीन व देवस्थान इनाम जमिनीवर अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. महसूल मंत्री श्री. बावनकुळे … Read more

जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

अहिल्यानगर, दि. २१ – राज्यातील जुन्या वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार, १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन वाहनांसाठी एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे. तसेच, … Read more

भारतात सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन ! बॅटरी किंग iQOO Z10 लवकरच होणार लॉंच

iQOO चा आगामी स्मार्टफोन ‘iQOO Z10’ येत्या 11 एप्रिल 2025 रोजी भारतात लॉन्च होणार आहे, आणि याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे. हा फोन Z मालिकेतील नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन असून, यात खास करून 7300mAh ची प्रचंड बॅटरी देण्यात येणार आहे.कंपनीच्या दाव्यानुसार, ही भारतातील स्मार्टफोनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असेल. या फोनचा टीझर देखील आला आहे, … Read more

शाळेतील विनयभंग प्रकरण : पर्यवेक्षक निलंबित, चौकशीच्या फेऱ्यात इतर शिक्षक !

पारनेर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी संबंधित पर्यवेक्षकावर कारवाई करण्यात आली असून, त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेने शिक्षण संस्थेतील वातावरण आणि विद्यार्थी-पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. शिक्षण संस्थेने तातडीने निर्णय घेत, आरोपी पर्यवेक्षकास सेवेतून निलंबित करून त्याचे … Read more