थकबाकीदारांना नोटिसा देणाऱ्या मनपालाच ‘जलसंपदा’चा अल्टिमेटम

अहिल्यानगर : शहरातील थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस देत कारवाई करणाऱ्या मनपालाच जलसंपदा विभागाने दणका दिला आहे. मुळा धरणातून शहरासाठी घेतल्या जाणाऱ्या बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीपोटी महापालिकेकडे ११ कोटी ६३ लाख ७१ हजार ८३६ रुपये थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीसा बजावूनही थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने शुक्रवारपर्यंत (१५ मार्च) अल्टिमेटम दिला असून त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा … Read more

येत्या 24 तासात संकटाचा काळ संपणार ! ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील सर्व ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान ग्रहांच जेव्हा राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होत असतात आणि याचा सरळ … Read more

यंदा खाणाऱ्यांना नव्हे तर पिकवणाऱ्यांना कांदा रडवणार ?

अहिल्यानगर : आवक कमी असल्याने सुरुवातीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, या आठवड्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोमवारी दि. ११ रोजी झालेल्या लिलावात नगरच्या नेप्ती उपबाजारसमितीत एक नंबर कांद्याला ११०० रुपये भाव मिळला असून शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघाला नाही. सद्या कांदा निर्यातीवर शासनाने २० टक्के निर्यात शुल्क लवलेले आहेत. हे त्वरीत हटविण्यात यावेत, तसेच … Read more

महिनाभरात पाणी योजनेचा वीजपुरवठा बारा वेळा खंडित

अहिल्यानगर – शहराच्या पाणी पुरवठा योजनेवरील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. १५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत १२ वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद पडून शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे पत्र प्रशासक तथा आयुक्त यशवंत … Read more

Shetkari Karj Mafi : शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज ! आता होणार हे आंदोलन…

सरकारी धोरणातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच दयनीय होत आहे. हमीभाव आणि उत्पादन खर्च यामध्ये तफावत वाढल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अजित काळे … Read more

सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला : आमदार हेमंत ओगले

१२ मार्च २०२५ श्रीरामपूर : शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, व्यापारी व उद्योजकांसह सर्वसामान्य जनतेचे काहीच घेण देणं नसलेला हा अर्थसंकल्प असून, लाडक्या बहिणींना देखील या सरकारने फसवले. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका आमदार हेमंत ओगले यांनी केली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाच्या हमी भावाबाबत घोषणा नाही,शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा पण फसवी निघाली. निवडणुकीत दिलेल्या … Read more

Reliance Jio आणि Elon Musk चा मेगा करार ! भारतीय इंटरनेट मार्केटमध्ये मोठा भूकंप !

भारताच्या दूरसंचार क्षेत्रात एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या Jio Platforms Limited (JPL) आणि Elon Musk यांच्या SpaceX च्या Starlink ने भारतात उपग्रह-आधारित ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे. विशेष म्हणजे, भारती एअरटेलने Starlink सोबत भागीदारी जाहीर केल्यानंतर लगेचच Jio ने हा मोठा करार केला आहे. यामुळे भारताच्या ग्रामीण आणि … Read more

हरेगाव मळ्यातील १२७ एकर जमीन व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न ! शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका

१२ मार्च २०२५ श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव मळ्यातील १२७ एकर जमीन नियमबाह्यपणे एका व्यावसायिकाला देण्यात आल्याचा आरोप आकारी पडीक संघर्ष समितीने केला आहे. तालुक्यातील नऊ गावांतील शेतकऱ्यांना साडेसात हजार एकर जमिनी देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली आहे.असे असताना व्यावसायिकांना जमीन भाडेतत्त्वावर कशी देण्यात आली ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला … Read more

MSRTC Vehicle Tracking System कामच करत नाही ! प्रवाश्यांची तीव्र नाराजी

MSRTC Vehicle Tracking System : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बहुतांशी बसला ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम’ बसविण्यात आली आहे. संगमनेर आगारातील ५९ बसला सुद्धा ही सिस्टम बसविली आहे. संगमनेर बसस्थानकात दोन स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यावर या बसस्थानकात येणाऱ्या बस किती वेळात येतील, याबाबत माहिती मिळते. मात्र, परिवहन महामंडळाने विकसित केलेल्या अॅपवर बसची माहिती मिळत नाही. … Read more

राहुरी कृषी विद्यापीठाचा दुधी भोपळा देशभर गाजणार! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी !

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाने विकसित केलेला दुधी भोपळ्याचा सुधारित वाण आर.एच.आर.बी.जी. ५४ (फुले गौरव) याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना येथे पार पडलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक आढावा बैठकीत हा वाण मध्य प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी प्रसारित करण्यास मंजुरी देण्यात आली. हा … Read more

Anandacha Shidha आणि शिवभोजन योजना बंद ! चालकांमध्ये भीतीचे वातावरण

राज्याच्या अर्थसंकल्पात ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ योजनेकरिता कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात न आल्याने जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांवर संकट ओढवले आहे. ‘आनंदाचा शिधा’ योजनेच्या माध्यमातून दिवाळी, दसरा आणि गुढीपाडवा अशा सणांच्या वेळी गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात होत्या. याशिवाय, रोज हजारो गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू असलेली शिवभोजन थाळीही बंद होण्याच्या मार्गावर आहे. नगर जिल्ह्यात … Read more

अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आणि मृत्यू झाला ? हरेगाव प्रकरणात नवा ट्विस्ट!

हरेगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी शुभम माघाडे आणि त्याचे सासरे भानुदास गायकवाड यांचा झालेला अपघाती मृत्यू हा केवळ योगायोग आहे की सुनियोजित कट, याचा सखोल तपास करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आणि भीमशक्ती संघटनेने केली आहे. रविवारी संध्याकाळी एस कॉर्नर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी नोंदवले असले, तरी अपघातस्थळी कोणत्याही … Read more

Kanya Sumangala Yojna : झाडे लावा, पैसे मिळवा! ‘कन्या वनसमृद्धी योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान, पण प्रशासन झोपले का?

मुलींचा जन्मदर वाढावा आणि राज्यातील वनेतर क्षेत्र अधिकाधिक वृक्षलागवडीखाली यावे, या उद्देशाने २०१८ मध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘कन्या वनसमृद्धी योजना’ सुरू करण्यात आली. ही योजना पर्यावरणसंवर्धनासोबतच महिलासक्षमीकरणालाही चालना देणारी आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करतानाच कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, असा या योजनेमागील हेतू आहे. मात्र, योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने अनेक शेतकरी … Read more

कोणत्या योजना बंद केल्या ? वाचा सरकारच्या मोठ्या घोषणांचा खोटारडेपणा

राज्यातील महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या योजना बंद केल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला. मंगळवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महिलांच्या योजना गुंडाळल्या विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी लाडकी बहिण योजनेसाठी १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याचे … Read more

शंभर फूट दरीत ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू ! धोकादायक वळणाने घेतला आणखी एक जीव

माणिकदौंडी घाटात रविवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. बारामतीवरून छत्रपती संभाजीनगरकडे पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो थेट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक प्रवीण आजिनाथ मेंगुळे (वय ३९, रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे १०० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले … Read more

विजेचे बिल शून्य? ‘सूर्यघर’ योजनेमुळे उन्हाळ्यात AC आणि पंखे मोफत चालवा!

उन्हाळ्याच्या दिवसांत विजेच्या मागणीत मोठी वाढ होते. फेब्रुवारी ते मे या कालावधीत कूलर, एसी आणि फ्रीजचा वाढता वापर विजेच्या तुटवड्याला कारणीभूत ठरतो. याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने “पंतप्रधान सूर्यघर योजना” कार्यान्वित केली आहे. या योजनेमुळे ग्राहक स्वतःच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज निर्मिती करू शकतात आणि विजेच्या वाढत्या खर्चातून मुक्तता मिळवू … Read more

कोपरगावमध्ये भीषण अपघात! नशेत असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला

कोपरगाव येथे भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसून मोठा अपघात घडला आहे. या घटनेत सुनंदा साबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर भरधाव … Read more

अकोलेच्या नऊ गावांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना जोरात तब्बल १६३ शेततळी पूर्ण; आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही केले कौतुक

अहिल्यानगर : पंतप्रधान कृषी सिंचन योजना याद्वारे पाणलोट विकास घटक प्रकल्पातून अकोले तालुक्यातील तालुक्यातील नऊ गावांत जलसंधारण उपक्रम राबवले जात आहेत. मागील दोन वर्षांत तालुक्यातील नऊ गावांमध्ये १६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. पुढील कालावधीत आणखी काही जलसंधारणाची कामे पूर्ण करून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उन्नतीसाठी नक्कीच लाभ होईल असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे … Read more