विजेचे बिल शून्य? ‘सूर्यघर’ योजनेमुळे उन्हाळ्यात AC आणि पंखे मोफत चालवा!

Published on -

उन्हाळ्याच्या दिवसांत विजेच्या मागणीत मोठी वाढ होते. फेब्रुवारी ते मे या कालावधीत कूलर, एसी आणि फ्रीजचा वाढता वापर विजेच्या तुटवड्याला कारणीभूत ठरतो. याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने “पंतप्रधान सूर्यघर योजना” कार्यान्वित केली आहे.

या योजनेमुळे ग्राहक स्वतःच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज निर्मिती करू शकतात आणि विजेच्या वाढत्या खर्चातून मुक्तता मिळवू शकतात.या योजनेचा मुख्य उद्देश घरगुती ग्राहकांना सौरऊर्जेच्या मदतीने वीज स्वयंपूर्ण बनवणे हा आहे.

ग्राहक स्वतःसाठी आवश्यक वीज तयार करू शकतात आणि अतिरिक्त तयार झालेली वीज महावितरण कंपनीकडून विकत घेतली जाते. त्यामुळे वीज बिल शून्यावर येते. त्याशिवाय, सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी ७८,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

निवासी घरगुती ग्राहकांना प्रत्येकी ३०,००० रुपये प्रति किलोवॅट या दराने अनुदान दिले जाते. दोन किलोवॅटपर्यंतच्या प्रकल्पांसाठी हे अनुदान उपलब्ध असून, तीन किलोवॅट क्षमतेसाठी अतिरिक्त १८,००० रुपये देण्यात येतात.

३ किलोवॅटपेक्षा मोठ्या प्रणालीसाठी एकूण ७८,००० रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. याशिवाय, बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामुळे अधिक लोकांना या योजनेचा लाभ घेणे सोपे झाले आहे.

सोलर वीज प्रणाली कार्यरत असल्याने विजेच्या अपुऱ्या पुरवठ्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे एसी, कूलर आणि पंखे अखंडित सुरू ठेवता येतात, ज्यामुळे उष्णतेपासून मुक्तता मिळते. यामुळे ग्राहक विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनतात आणि विजेचा खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

महावितरण कंपनी सोलर रूफटॉप प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांसाठी सोल नेट मीटरिंग सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही प्रक्रिया जलद आणि सुलभ असल्याने ग्राहक सहजपणे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करू शकतात.

सूर्यघर योजना केवळ वीज बचतीसाठी नाही तर पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन फायदेशीर उपाय आहे. विजेच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी ही योजना घरगुती ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe