शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा धक्का ! काय आहे संपूर्ण प्रकरण?

नगर शहरात सार्वजनिक ठिकाणी धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ८ मार्च रोजी भुईकोट किल्ल्याजवळ, नगर क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपीचे नाव फुरकान अन्वर कुरेशी (वय २५, रा. नागरदेवळे फाटा, ता. नगर) असे असून, पोलिसांनी त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार … Read more

अहिल्यानगर शहरात खळबळ ! प्रसिद्ध व्यापारी बेपत्ता, पोलिसांचा तपास सुरू

नगर शहरातील चितळे रोड परिसरातील दीपक ऑईल डेपोचे मालक दीपक लालसिंग परदेशी (वय ६८, रा. बोल्हेगाव गावठाण) हे २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून कसून तपास करत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा काहीही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी… दीपक परदेशी हे २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता … Read more

शिर्डी तीर्थक्षेत्राला विशेष निधी मिळण्यासाठी जगताप दाम्पत्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

११ मार्च २०२५ शिर्डी : २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रलंबित विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा … Read more

थरारक! बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले, मानेचा व पोटाचा भाग फाडला – राहुरी तालुक्यात भीतीचे वातावरण!

राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात सोमवारी पहाटे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत बिबट्याने शेतकऱ्याचे शीर धडापासून वेगळे करीत मानेचा व पोटाचा मोठा भाग फाडून खाल्ला. या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शोभाचंद उर्फ बोजी सिताराम गव्हाणे (वय ५५) असे या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव … Read more

शेतमालकांवर मजुरांच्या वाढत्या टंचाईची टांगती तलवार !

११ मार्च २०२५ सुपा : शेतीसाठी येणारा अमाप खर्च, त्यात अधिक क्षेत्र असल्याने मजुरांची व आर्थिक टंचाई, कामासाठी येण्याच्या विणवण्या, त्यात शेतमजूरांच्या संख्येत होणारी घट, सातत्याने होणारी मजुरीच्या दरात होणारी वाढ, यामुळे शेती न परवडण्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. शेतातील विविध कामे करण्यासाठी लागणाऱ्या शेतमजुरांच्या दरात वाढ झाली आहे. काही वर्षापासून सातत्याने वाढत … Read more

शिर्डीत पनीर भेसळ करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

११ मार्च २०२५ साकुरी : शिर्डी व परिसरात लग्नसराई तसेच विविध कार्यक्रमांमध्ये जेवणावळींसाठी पनीरला मोठी मागणी आहे. हॉटेल, ढाबे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही पनीर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते; मात्र वाढत्या मागणीमुळे हलक्या दर्जाचे आणि बनावट पनीर मोठ्या प्रमाणावर विकले जात असून, अन्न व औषध भेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या हलक्या … Read more

अकोले आगारचा प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : उडत्या छताची बस प्रवाश्यांसहित धावते घाटातून

११ मार्च २०२५ भंडारदरा : अकोले आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळत असून, कसाऱ्याला धोकादायक अवस्थेतील बसेस पाठवल्या जात असल्याचे समोर आले आहे. तारेने आणि दोरीने बांधलेल्या तसेच उडत्या छताच्या बसेस प्रवाशांसाठी सोडल्या जात असून, यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आगार हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी एस. … Read more

शेती बरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील लागणार मार्गी : आ.हेमंत ओगले

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : प्रवरा नदीला पाणी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघातील प्रवरा नदीवरील के.टी. वेअर भरण्याची मागणी केली होती. नदीवरील बंधाऱ्यांनी पाण्याचा तळ गाठला असून सदर बंधारे भरणे आवश्यक होते. नदी पात्रात पाणी सुटणार असल्याने शेती बरोबरच परिसरातील … Read more

कुत्तरवाडी तलावातून पाणी उपसा असाच चालू राहिल्यास पाणी टंचाईचा धोका ! पिण्याचे पाणी मिळणेही होऊ शकते कठीण…

११ मार्च २०२५ तिसगाव : कुत्तरवाडी (ता. पाथर्डी) तलावातून राजरोस कृषि पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे.परिणामी, तलावातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत चालला आहे.पाण्याचा उपसा तातडीने थांबवावा,अन्यथा तलावावर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. फेब्रुवारी पासूनच तालुक्यातील पाणी साठवण्याचे विविध स्रोत संपण्याच्या मार्गावर आहेत.काही गावांमध्ये पाण्याचे सर्व स्रोत कोरडे पडून पाण्याची मागणी आता वाढू … Read more

वंशपरंपरागत विश्वस्त यांना पदमुक्त करताना न्यायिक मार्गाचा अवलंब करा

परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज स्थापित अहिल्यानगर येथील श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, सावेडी येथील वंशपरंपरागत कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना विश्वस्त पदावरून काढताना विश्वस्त मंडळाने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांची बडतर्फी केल्याचा ट्रस्टने दाखल केलेला बदल अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्य आहे असे स्पष्ट प्रतिपादन पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त – २ राहुल मामू … Read more

मार्च एण्डची वाहतूक पोलिसांकडून वसुली जोरात ! वाहतूक कोंडीकडे मात्र दुर्लक्ष

१० मार्च २०२५ पुणे : गेल्या काही दिवसांपासून नगर रस्त्यावरील चौकाचौकांत वाहतूक पोलिसांच्या टोळ्या मार्च एन्डमुळे सक्रिय झाल्या आहेत. चौकाचौकात दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून लुटण्याचे काम सुरू आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वसुलीसाठी सक्रिय झालेले पुणे शहरातील वाहतूक पोलीस एवढी तत्परता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कधी दाखवणार, असा सवाल आता वाहन चालक करू लागले आहेत. … Read more

एसटीच्या ६७५, पीएमपीच्या ५५० बसला बसणार एचएसआरपी नंबरप्लेट

१० मार्च २०२५ पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. राज्य परिवहन विभागाकडून २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागातील विभागातील ६७५ तर, पीएमपीएमल विभागातील ५५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला उदंड प्रतिसाद

१० मार्च २०२३ : मुंबई : २८ जून २०२३ पासून मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत सीएसएमटी- मडगाव गोवा-सीएसएमटी मार्गावर तब्बल ५० हजार ६९० प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. वेगवान आणि सुरक्षित प्रवास, अत्याधुनिक सुविधा यामुळे या मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत … Read more

सोनेही होणार ‘लखपती’ ! बँकेच्या व्याजाहून अधिक लाभ ; शंभर वर्षांत भाव…

१० मार्च २०२५ छत्रपती संभाजीनगर : सोन्यातील गुंतवणुकीला पूर्वीपासून सुरक्षित मानले जाते. तंत्रज्ञान क्रांतीने गुंतवणुकीचे अनेक पर्याय उदयाला येत असले तरी विश्वसनीयतेमुळे सोन्यातील गुंतवणूक आजही बावनकशी आहे. फार दूरचा नाही, गेल्या दशकाचा विचार केला तरी सोन्याने तिपटीहून अधिक परतावा दिल्याचे दिसते. २०१५ मध्ये भाव २६३४. ३० रुपये प्रतिग्रॅम होता. तो आता ८६९७ रुपये प्रतिग्रॅम आहे. … Read more

रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करण्याची शक्यता ; महागाई कमी होण्याचा परिणाम

१० मार्च २०२५ नवी दिल्ली: जानेवारीमध्ये देशातील महागाईचा दर ५.२२ टक्क्यांवरून ४.३१ टक्क्यांवर घसरला. सलग चार महिने महागाई ५ टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या स्वीकारार्ह ४ टक्क्यांच्या लक्ष्याजवळ गेली. यामुळे संभाव्य दर कपातीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रेपो दर ६.२५ टक्के आहे, असे मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडच्या अहवालामध्ये म्हटले आहे. बाजारातील परिस्थिती … Read more

गुंतवणुकीच्या बाबतीत चांदीची चमक कायम ! यावर्षी दिला ‘इतक्या’ टक्के परतावा

१० मार्च २०२५ नवी दिल्ली : जागतिक अनिश्चिततेच्या काळात, चांदीदेखील गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे आणि यावर्षी आतापर्यंत सुमारे ११ टक्के परतावा दिला आहे. पुढील दोन-तीन वर्षांत चांदी परताव्याच्या बाबतीत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये जास्त चढ-उतार असल्याच्या कारणाने गुंतवणूक मालमत्ता तसेच औद्योगिक धातू म्हणून उपयुक्त आणि आकर्षक आहे. … Read more

सुजय विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं ! शिर्डीत लूट थांबणार भाविकांसाठी नवी नियमावली, दुकानदाऱ्या…

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर शहरात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. परिणामी, आता अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे, बेघरांसाठी निवास व्यवस्थेवर भर दिला जात आहे, तसेच साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. साईभक्तांकडून अनावश्यक शुल्क आकारणे, फसवणूक, चुकीचे व्यवहार, तसेच अवाजवी किमती लावणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी दुकानदारांसाठी नवीन नियमावली तयार केली … Read more

बाळासाहेब थोरात आक्रमक ! म्हणाले निळवंडे प्रकल्पाचा लढा जिंकला, पण आता अपर तहसीलसाठी…

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्थापन करण्यात आलेले अपर तहसील कार्यालय अनेक गावांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील तळेगाव दिघे, घारगाव, साकुर आणि अन्य गावांतील नागरिकांना अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने जनतेच्या सोयीचा विचार न करता निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली. अपर तहसील कार्यालये जनतेसाठी … Read more