Tractor Insurance:- आपण अनेक प्रकारची वाहने घेतो व यामध्ये दुचाकी पासून तर चारचाकी तसेच कार व शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हे वाहन घेतले जाते.जर ट्रॅक्टर या वाहनाचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी हे एक उपयुक्त वाहन असून शेतीचे पूर्व मशागती पासून तर थेट शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
परंतु वाहन म्हटले म्हणजे ते रस्त्यावर चालत असल्याने केव्हा अपघात होईल याविषयी कुठलीही शाश्वती आपल्याला देता येत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होते व या प्रकारचा आर्थिक फटका बसू नये म्हणून भारतीय वाहन कायद्यांतर्गत इन्शुरन्सला खूप महत्त्व आहे.
त्यामुळे ट्रॅक्टर घेतल्यावर त्याचा इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही इन्शुरन्स घेतला नाही तर तुमच्यावर वाहन कायद्यांतर्गत कारवाई देखील होऊ शकते. समजा शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टर घेतला व त्याचा इन्शुरन्स करून घेतला तर त्याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळतात.
माहित आहेस की जर तुम्ही ट्रॅक्टरचा इन्शुरन्स घेतला व एखाद्या अपघात समयी ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले तर तुम्हाला या माध्यमातून संपूर्ण खर्च मिळू शकतो. म्हणून या लेखात आपण ट्रॅक्टर इन्शुरन्स बाबत पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
ट्रॅक्टर इन्शुरन्सचे काही प्रकार
1- थर्ड पार्टी इन्शुरन्स– इन्शुरन्सचा हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो आणि यामध्ये ट्रॅक्टर मालकाला कायदेशीररित्या सर्व प्रकारची देणेदारी दिली जाते. म्हणजे जर एखाद्या अपघातामध्ये ट्रॅक्टरचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई तर मिळतेच परंतु ट्रॅक्टर मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला
तर हा प्रकार देखील ट्रॅक्टर इन्शुरन्सच्या कक्षेमध्ये येतो व तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागत नाही. थर्ड पार्टी इन्शुरन्समुळे ट्रॅक्टर मालक आणि ड्रायव्हर यांना अपघातानंतर होणारा सर्व वैद्यकीय खर्च देखील मिळतो.
2- सर्व समावेशक ट्रॅक्टर इन्शुरन्स– या प्रकारच्या इन्शुरन्समध्ये तुमचे ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षित करण्यात येते. यामध्ये ट्रॅक्टरचा अपघात तसेच नैसर्गिक संकटात, आग किंवा चोरीची घटना घडली व त्यामुळे ट्रॅक्टरचे काही नुकसान झाले तर कंपनीकडून तुम्हाला संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाते.
ड्रायव्हरचे काही नुकसान झाले तर या प्रकारांमध्ये ते ग्राह्य धरण्यात येते. या इन्शुरन्स प्रकारामध्ये सर्व प्रकारचे नुकसान तसेच वैयक्तिक अपघात भरपाई आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील समावेश होतो.
ट्रॅक्टरचा इन्शुरन्स का करावा?
जर आपण याबाबतीत भारतीय मोटर वाहन कायदा पाहिला तर त्यानुसार प्रत्येक नवीन ट्रॅक्टर जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्याचा इन्शुरन्स अनिवार्य करण्यात आला असल्यामुळे तो घेणे गरजेचे आहे. तुम्ही ट्रॅक्टरचा इन्शुरन्स केला नाही तर कायद्याद्वारे तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
या व्यतिरिक्त ट्रॅक्टरचे काही नुकसान झाले तर ते टाळण्याकरिता इन्शुरन्स तुम्हाला खूप मदत करतो. तुम्ही जर ट्रॅक्टरचा इन्शुरन्स काढला असेल तर तुमच्या ट्रॅक्टरची प्रत्येक नुकसान भरपाई मिळण्यास तुम्ही पात्र असतात. कोणत्याही स्वरूपाचे किंवा कोणत्याही परिस्थितीत ट्रॅक्टरच्या नुकसान झाले तर संबंधित विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते.
ट्रॅक्टर इन्शुरन्सचे फायदे
1- ट्रॅक्टरचे नुकसान झाले तर ते ट्रॅक्टर इन्शुरन्स मुळे भरून निघण्यास मदत होते.
2- तुमचा ट्रॅक्टर चोरीला गेला तरी तुम्हाला नुकसान भरपाई मिळते.
3- शेतामध्ये काही काम सुरू आहे व एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे ट्रॅक्टरचे नुकसान झाल्यास तुम्हाला इन्शुरन्सच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते.
4- ट्रॅक्टरचा एखादा अपघात झाला व त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींचे काही नुकसान झाले असेल तरीदेखील या नुकसान भरपाई मध्ये धरले जाते.
5- समजा एखाद्या अपघातामध्ये ट्रॅक्टरवरील ड्रायव्हरला काही इजा झाली किंवा तो जखमी झाला तर त्याचा संपूर्ण हॉस्पिटलचा खर्च या माध्यमातून मिळतो.
6- काही कारणामुळे जर आग लागली व त्यामध्ये ट्रॅक्टरचे नुकसान झाले तरी देखील नुकसान भरपाई मिळते.
कुठून काढाल ट्रॅक्टरचा इन्शुरन्स?
ट्रॅक्टरचा इन्शुरन्स घेणे किंवा करणे खूपच सोपे असून यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एचडीएफसी बँकेसारख्या विविध बँकांची मदत घेऊन त्यांची इन्शुरन्स पॉलिसी मिळवू शकतात. याशिवाय विविध प्रकारच्या विमा कंपन्यांकडून देखील ट्रॅक्टर साठी विमा पॉलिसी दिली जाते.
तुम्हाला जर इन्शुरन्स घ्यायचा असेल तर तुमचा इन्शुरन्सचा प्रकार आणि लागणारी कागदपत्रे यांच्या अधिकच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळील बँक शाखेशी संपर्क साधू शकता.