Soybean Market Update : महाराष्ट्रात खरीप हंगामात दोन पिकांची सर्वाधिक शेती केली जाते. ती पिके म्हणजे कापूस आणि सोयाबीन. या पिकांचा नगदी पिकांच्या यादीत समावेश आहे. मात्र सध्या या पिकांपासून शेतकऱ्यांना मिळणारी नगद खूपच कमी आहे. दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे.
खरं पाहता, सोयाबीन पासून शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने याला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र पिवळं सोनं यंदा मातीमोल झालं आहे आणि बळीराजाला देखील मातीमोल करू पाहत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे याच्या उत्पादनात घट झाली आणि आता बाजारात मालाला कवडीमोल दर मिळत असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज देखील सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. एकीकडे जाणकार दरात वाढ होणार असा दावा करत आहे तर बाजारातील वस्तूस्थिती पाहता शेतकऱ्यांची पायाखालची जमीन सरकत आहे.
सध्या सोयाबीनला बाजारात साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी सरासरी दर मिळत आहे. हमीभावापेक्षा साहजिकच अधिक दर मिळत आहे मात्र उत्पादनात झालेली घट पाहता सध्या मिळत असलेला दर कवडीमोल जाणवत आहे. दरम्यान आज आपण नेहमीप्रमाणे सोयाबीनलावाची माहिती जाणून घेणार आहोत.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 7000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5090 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5525 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5310 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 650 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5479 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5351 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 820 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5325 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5162 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 935 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5451 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5213 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1195 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5680 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5340 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 400 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- माझ्या मार्केटमध्ये हजार 2748 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5570 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5340 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या मार्केटमध्ये 2100 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6000 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.