State Employee News : हिवाळी अधिवेशन गाजणार ! राज्य कर्मचाऱ्यांचे ‘हे’ प्रश्न मार्गी लागणार ; नेमक्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तरी काय?

State Employee News : येत्या काही दिवसात राजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाकडे शेतकरी, कामगार, सामान्य जनतेचे तसेचराज्य कर्मचाऱ्यांचे देखील लक्ष लागून आहे. खरं पाहता हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा मास्टर प्लॅन रेडी झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विरोधक शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या उपस्थित करणार आहेत, यामध्ये शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा यावर सखोल चर्चा होण्याची आणि काहीतरी ठोस निर्णय लागण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचे देखील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत.

यामध्ये जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागू करणे हा एक महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा राहणार आहे. याशिवाय बक्षी समिती खंड 2, सेवानिवृत्तीचे वय याविषयी देखील हिवाळी अधिवेशनातं चांगलीच रंगतदार चर्चा होण्याचे चिन्ह आहेत. खरं पाहता, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस राज्य शासनाच्या जुनी पेन्शन योजनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे.

Advertisement

त्यामुळे निश्चितच विपक्ष कडून सरकारला या मुद्द्यावर घेरलं जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे साहजिकच शासनावर दबाव तयार होणार आहे. याव्यतिरिक्त राज्य कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी निर्दशने, आंदोलने केली आहेत यामुळे या मुद्द्यावर सरकारला विचार करणं भाग आहे.

येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र शासनाच्या धर्तीवर ज्या पद्धतीने देशातील 25 राज्यांनी सेवानिवृत्तीचे वय 60 केले आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सेवानिवृत्तीचे वय वाढवावे, केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात लवकरच महागाई भत्ता वाढ दिली जावी, त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोगातील थकीत हप्ते कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वर्ग करावे, या राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीवर चर्चा रंगणार आहे.

दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढणार आहेत. एकंदरीत यंदाचा हिवाळी अधिवेशन हे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गाजणार आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवल्या जातात का, यावर काही तोडगा निघतो का? याकडे लागून आहे.

Advertisement