अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवशी 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- बुधवारी जिल्ह्यात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८३३ वर गेली आहे. दिवसभरात नवे ३०४ पॉझिटिव्ह आढळून आले. १८ सप्टेंबरपासून रुग्ण व मृत्यूचे प्रमाण घटले होते.

बुधवारी मात्र २० जणांचा बळी गेला. २४ तासांत रुग्णसंख्येत ३०४ ने वाढ झाली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७४० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये १०४, खासगी प्रयोगशाळेत २८ आणि अँटीजेन चाचणीत १७२ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील ३६, अकोले १०, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रामीण ७, नेवासे ७, पारनेर ४, राहाता १०, राहुरी ५, संगमनेर ११, शेवगाव २, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ८ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा १४, नगर ग्रामीण ७, पाथर्डी २, राहाता १, राहुरी २, संगमनेर १, आणि श्रीरामपूर १ रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १६, अकोले २६, जामखेड ४, कर्जत ५, कोपरगाव ४, नगर ग्रामीण ७, नेवासे ४, पारनेर १०, पाथर्डी ३५, राहाता १४, राहुरी ९, संगमनेर १४, शेवगाव १२ श्रीगोंदे ५, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णांची आजवरची संख्या ५३ हजार ८२३ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५० आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment