भाजप युवा मोर्चच्या शहराध्यक्षाचा काँग्रेस मध्ये प्रवेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : शहर भाजप युवा मोर्चाचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष श्री. अज्जुभाई शेख यांनी मा. नामदार श्री बाळासाहेब थोरात यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.

भाजपा सरकार CAA, NRC कायद्या आणून अल्पसंख्याक समाजाविषयी तेढ निर्माण करीत आहे. केंद्रातील भाजपाच्या या भुमिकेला विरोध म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेबजी थोरात यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले व अहमदनगर शहरात काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी जोमाने आपले कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी सक्रिय होण्याची सुचना केली.

याप्रसंगी अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस विभागाचे अध्यक्ष अनिसभाई शेख, संगमनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब ओहळ, रफिक शेख मेजर, वाहीद शेख, गुड्डू शेख, रईसभाई, शौकतभाई, गौरव बुगे, तौसीफ बागवान, विशाल जाधव, अकबर शेख, गौरव कराळे, भाऊ परदेशी, योगेश दिवाणे यांसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24