अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- लॉकडाऊन काळात कमिन्स जनरेटर कंपनीने कामगारांची ऐतिहासिक पगारवाढ केली आहे. या करारामुळे कामगारांच्या पगारात १७०९० रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे कामगारांना किमान ६६४२८ रुपये व कमाल ७४७७५ रुपये इतका विक्रमी पगार मिळणार आहे. नगर जिल्ह्यातील कामगारांच्या मिळकतीचा हा एक उच्चांक ठरला आहे.
कमिन्स जनरेटर प्रा. लि. या कंपनीत कामगारांच्या पगारवाढीच्या ऐतिहासिक करारावर नुकताच स्वाक्षरी सोहळा पार पडला.
या करारावरील चर्चेत असोसिएशन अाॅफ इंजिनियरिंग वर्कर्स या डॉ. दत्ता सामंत प्रणित संघटनेचे अध्यक्ष भूषण सामंत, उपाध्यक्ष वर्गिस चाको, सरचिटणीस संजय कोळवणकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
तर व्यवस्थापनाच्या वतीने व्हा. प्रेसिडेंट रमण, रितेश जोशी, अमित पाटील, प्लांटहेड किरण क्षिरसागर व झपके, एच. आर. लिडर कौशल्येंद्रा व आदित्य देसाई, विठ्ठल चौधरी, श्रीराम परांडकर यांनी सहभाग घेतला.
या करारामुळे कामगारांच्या पगारात १७०९० रुपयांची वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त सुविधा घेण्यासाठी प्रत्येक कामगाराला २३७१ रुपये पगारवाढीत अतिरिक्त देण्याचे मान्य करण्यात युनियन यशस्वी झाली आहे.
शिवाय बोनसमध्ये सरसकट ६००० रुपये प्रत्येक कामगारांच्या मागील रक्कमेत वाढ मिळवण्यात यशस्वी झाल्याने किमान ३० हजार रुपये व व कमाल ३४ हजार रुपये इतका बोनस मिळणार आहे.
हा करार १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२३ असा साडेतीन वर्षासाठी आहे. १ जुलै २०२० पासून अंलात येत आहे. या व्यतिरिक्त १ पेड हॉलिडेे,
आऊट स्टेशन अलाॅऊन्समध्ये ९०० रुपयांची अतिरिक्त वाढ व ३ वेळा अतिरिक्त लाँग सर्व्हिस अवार्ड मिळवण्यात युनियन यशस्वी झाली आहे.
या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंट रमण साहेब, एबीओ एचआर लिडर रितेश जोशी, एच आर लिडर अमित पाटील, प्लांट हेड किरण क्षिरसागर व झपके, एच. आर. लिडर कौशल्येंद्रा, विठ्ठल चौधरी,
श्रीराम परांडकर व आदित्य देसाई यांनी तर युनियन च्या वतीने सरचिटणीस संजय कोळवणकर, उपाध्यक्ष रामेश्वर निजवे, युनियन सदस्य विजय शिरसाट, राहुल बेद्रे, विजय धात्रक, मनोज रोकडे यांनी स्वाक्षऱ्या करुन कराराची पुर्तता केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा